ॲग्रो विशेष

Crop Damage : गारपिटीचा तेरा हजार हेक्टर क्षेत्राला तडाखा

Hailstorm : वरोऱ्यात सर्वाधिक नुकसान; सर्वेक्षणाचे काम सुरू

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
चंद्रपूर ः जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी अवकाळी पावसासह गारपीट झाली. त्यात रब्बी हंगामातील हरभरा, गहू, तूर आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. गारपिटीचा १३ हजार हेक्टर क्षेत्राला तडाखा बसला आहे. सध्या पंचनाम्याचे काम सुरू असल्याने नुकसानीचा आकडा वाढविण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

हवामान विभागाने जिल्ह्यात तीन दिवस अवकाळी पाऊस पडेल, असा इशारा दिला होता. त्यानुसार शुक्रवारपासूनच ढगाळ वातावरण होते. शुक्रवारी (ता. ९) रात्री काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या. शनिवारी (ता. १०) रात्री चंद्रपूर शहरात अर्धा तास पाऊस झाला. वरोरा येथे सायंकाळी सातपासून पावसाला सुरवात झाली. तालुक्यातील अनेक भागांत गारपीट झाली. पोंभुर्णा, चिमूर आणि चंद्रपूर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली.

या अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील हरभरा, गहू, तूर आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले.
मागीलवर्षी खरिपातील सोयाबीन, कापसाचे मोठे नुकसान झाले. सोयाबीनचे जवळपास ५६ हजार हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाले. खरीप हंगाम हातून गेला. त्यामुळे रब्बी हंगामावर शेतकऱ्यांची भिस्त होती. मात्र, रब्बी हंगामावरही अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पाणी फेरले आहे.

चार तालुक्यांत मोठे नुकसान
जिल्ह्यात शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. या गारपिटीचा मोठा फटका चंद्रपूर, वरोरा, भद्रावती आणि पोंभुर्णा तालुक्याला बसला. या भागातील गहू, हरभरा, तूर आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. पालकमंत्र्यांनी तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर पंचनाम्याला सुरवात झाली. सध्या पंचनाम्याचे काम सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार १२ हजार ९३८ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Natural Farming: नंधाना गावाची नैसर्गिक, विषमुक्त शेतीकडे शाश्वत वाटचाल

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा; राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्याकडे मागणी

Onion Farming: कांदा पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरजेनुसार व्यवस्थापन फायदेशीर

Gold Silver Price Today: सोने- चांदी दरात घसरण, आजचा प्रतितोळ्याचा दर काय?

Farmers Crisis: मळणीला आला वेग; अतिवृष्टीने घटला तुरीचा उतारा

SCROLL FOR NEXT