Vidhansabha Election  Agrowon
ॲग्रो विशेष

Vidhansabha Election 2024 : तेरा हजार कर्मचाऱ्यांनी बजावला मतदानाचा हक्क

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघांत १३ हजार ५७० कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत मतदानाचा हक्क बजावला आहे.

Team Agrowon

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघांत १३ हजार ५७० कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत मतदानाचा हक्क बजावला आहे. विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांकडून टपाली मतदान करण्यात येत आहे.

इतर जिल्ह्यांतून निवडणुकीच्या कामानिमित्त आलेल्या आणि जिल्ह्यातील, अशा सुमारे २३ हजार कर्मचाऱ्यांना टपाली मतदान करता येणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे, म्हणून प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

परंतु, निवडणुकीच्या प्रत्यक्ष कामात सहभागी होताना अनेकांना आपल्या मतदान केंद्रापासून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा तालुक्यात जाऊन निवडणुकीत कर्तव्य पार पाडतात. हे कर्मचारी, अधिकारी मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता असते.

हे टाळण्यासाठी तसेच कर्मचारी, अधिकाऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळावा, म्हणून प्रशासनाकडून या कर्मचाऱ्यांना टपाली मतदानाचा पर्याय दिला जातो. आतापर्यंत १३ हजार कर्मचाऱ्यांनी मतदान केले आहे. काही मतदारसंघांत कर्मचाऱ्यांच्या रांगादेखील लागल्याचे चित्र बघण्यास मिळाले.

या संदर्भात टपाली मतदान प्रक्रिया समन्वयक अधिकारी दत्तात्रय कवितके म्हणाले, ‘‘पुण्यात १३ हजार कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान केले आहे. मतदारांच्या मतपत्रिका या मतदानाची प्रक्रिया पूर्ण करून संबंधित मतदारसंघांत पोहोचविल्या जाणार आहेत. त्यानंतर २३ नोव्हेंबरला मतमोजणीत त्यांचा समावेश करण्यात येईल.’’

टपाली मतपत्रिका पाठवली जाते

जिल्ह्यात किंवा जिल्ह्याबाहेर निवडणुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना मतदान करता येते. अगोदर पोस्टाद्वारे मतदान करण्याची पद्धत होती. आता त्यात बदल झाला असून राज्यातील अशा कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान अर्ज घेऊन त्यांना ते ज्या जिल्ह्यात कार्यरत आहेत, तेथे मतपत्रिका पोहोचविल्या जातात. अशा कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिका पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, मतदान प्रक्रिया सुरू आहे.

मतदान प्रक्रियेबाबत

सुमारे साडेतेरा हजार कर्मचाऱ्यांनी टपाली मतदानासाठी अर्ज केले होते

कर्मचाऱ्यांना त्यांच्या मतदारसंघातील मतपत्रिका मतदानासाठी दिल्या

जिल्ह्यातील मतदार इतर जिल्ह्यात नियुक्त आहेत, अशा सुमारे सव्वातीन हजार कर्मचाऱ्यांचे अर्ज

इतर जिल्ह्यांत कर्मचारी जेथे नियुक्त आहेत, त्याठिकाणी मतपत्रिका पाठविल्या

पुण्यात इतर जिल्ह्यांतील मतदार असलेल्या सुमारे सहा हजार कर्मचाऱ्यांचे अर्ज आले होते

बाहेरील मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी बाहेरील जिल्ह्यांतून मतपत्रिका आल्या

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Silage Production : मुरघास बनविताना काय काळजी घ्यावी?

Environmental Management : युवकांद्वारे साधू जल-पर्यावरण शाश्वतता

Poultry Farming : ‘पोल्ट्री’ला हवा मदतीचा हात

Maharashtra Election : निवडणूक काळात लालपरी प्रवाशांसाठी बंद राहणार

Onion Rate : कांदा दरावर केंद्राची बारीक नजर

SCROLL FOR NEXT