Bidri Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Bidri Sugar Factory : बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत आता तीसरी आघाडी, 'स्वाभिमानी' स्वबळावर लढणार

K P Patil VS Prakash Abitkar : सत्ताधारी गटाचे प्रमुख माजी आमदार के. पी. पाटील यांच्याविरोधात आमदार प्रकाश आबीटकर जोरदार प्रचारात उतरले आहेत.

sandeep Shirguppe

Kolhapur Sugar Factory News : कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्री साखर कारखान्याची निवडणूकीचे पडघम वाजले आहेत. सत्ताधारी गटाचे प्रमुख माजी आमदार के. पी. पाटील यांच्याविरोधात आमदार प्रकाश आबीटकर जोरदार प्रचारात उतरले आहेत. दरम्यान या दोघांमध्ये कलगीतुरा रंगला असताना आता तीसरी आघाडी मैदानात उतरली आहे.

बिद्री साखर कारखान्याची निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढविणार असल्याचा निर्धार युवा जिल्हा अध्यक्ष अजित पोवार यांनी व्यक्त केला. तिटवे येथे प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी भूमिका मांडली.

शेतकरी संघटनेच्या राधानगरी, भुदरगड, कागल आणि करवीर तालुक्यांतील प्रमुख कार्यकर्त्यांचा तिटवे येथे मेळावा झाला. या मेळाव्यात संघटनेचे राष्ट्रीय नेते राजू शेट्टी यांच्या १७ ऑक्टोबरला सुरू होणाऱ्या ५२२ किलोमीटरची पदयात्रा नियोजन आणि बिद्री कारखाना निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली.

यावेळी युवा अध्यक्ष अजित पोवार म्हणाले की, गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये के. पी. पाटील भाजपबरोबर गेलेत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला बाजूला केलं. या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणाच्या सोबत जाऊन विश्वासघात करून घेणार नाही, तर 'बिद्री'चे रणांगण स्वबळावर जिंकणार असल्याचं सांगितले. यावेळी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एक मताने निवडणूक लढविण्याच्या निर्धार केला.

या मेळाव्यात संतोष बुटाले, बाळासाहेब पाटील, आनंदा पाटील, संजय देसाई, पांडुरंग जरग, सी. के. पाटील, विजय यादव, बंडोपंत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कुंडलिक पाडळकर, आनंदा घारे, प्रकाश जाधव, पंडित किल्लेदार, एकनाथ एरूडकर, भागोजी कांबळे, सदाशिव चौगले उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्ह्यात (दि०९) आज सोमवारपासून सहकारी संस्थांची रणधुमाळी सुरू होत आहे. ग्रामपंचायत निवडणुका व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीचे वेळापत्रक तयार केले जाणार असून, सहकार विभागाच्या निवडणूक कार्यक्रमाकडे नजरा लागल्या आहेत.

'बिद्री' व भोगावती साखर कारखान्यांचे मतदान व मतमोजणी दिवाळीनंतर कसे घेता येईल, अशा पद्धतीनेच येत्या चार पाच दिवसांत कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतींबरोबरच संस्थांच्या निवडणुकांमुळे गावगाड्यातील राजकीय वातावरण तापणार आहे.

पावसाळ्यामुळे जून महिन्यात स्थगित केलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका आज, सोमवारपासून सुरू करण्याचे आदेश सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत. त्यानुसार सहकार विभागाने नियोजन केले आहे.

'बिद्री', 'भोगावती', 'आजरा' कारखान्यांच्या निवडणुका होणार आहेत. ऐन दिवाळीत लगबग सुरू राहणार असल्याने कर्मचाऱ्यांच्या सुट्या आणि कार्यक्रम यांचा मेळ घालून कार्यक्रम तयार करावा लागणार आहे. मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागते, यासाठी मतदान व मतमोजणी दिवाळीनंतर कसे घेता येईल, असा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT