Kolhapur Bidri Factory : कोल्हापूरच्या बिद्री साखर कारखान्याला सलग दोन वर्षे देशपातळीवरील पुरस्कार

Kolhapur Bidri Sugar Factory : बिद्री कारखान्यास राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट को-जनरेशन प्रकल्प चालवल्यामुळे प्रथम क्रमांक देण्यात आला होता.
Kolhapur Bidri Factory
Kolhapur Bidri Factoryagrowon
Published on
Updated on

Kolhapur Bidri Sugar Factory : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात असणाऱ्या बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या प्रकल्पास को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाकडून २०२२-२३ साठीचा सर्वोत्कृष्ट सहवीज निर्मिती प्रकल्पाचा देशपातळीवरील विशेष पुरस्कार जाहीर झाला. दरम्यान मागच्या वर्षीही या कारखान्यास राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट को-जनरेशन प्रकल्प चालवल्यामुळे प्रथम क्रमांक देण्यात आला होता.

सध्या बिद्री साखर कारखान्याची निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीत कागल तालुक्यातील अनेक नेत्यांची कसोटी रंगणार आहे. दरम्यान ही निवडणूक म्हणजे विधानसभेची रंगीत तालीम असल्याचे बोलले जात आहे. माजी आमदार के. पी. पाटील यांच्या गटाकडे हा साखर कारखाना आहे. सध्या यांच्याविरोधात समरजीत घाटगे आणि प्रकाश अबिटकर हे असण्याची चिन्हे दिसत आहे.

अशातच साखर कारखान्यास पूरस्कार मिळाल्याने के.पी. पाटील गटाला बळ मिळत असल्याचे दिसून येत आहे. मागच्या वर्षीच्या गळीत हंगामात बिद्री साखर कारखान्याने सर्वाधिक एफआरपी देत जिल्ह्यात पहिला ठरला होता. सलग दोन वर्षे देश पातळीवरील पुरस्कार प्राप्त झाल्याने बिद्री साखर कारखान्याची जिल्ह्यात जोरदार चर्चा होत आहे.

बॉयलर ८७ कि.ग्रॅ./सेमी स्क्वेअरपेक्षा जास्त क्षमता गटामधून सहवीज २०२२-२३ चा उत्कृष्ट सहवीज निर्मिती प्रकल्प पुरस्कार 'बिद्री'ला मिळाला. तसेच वैयक्तिक गटातून प्रोजेक्ट मॅनेजर महेश सलगर यांना बेस्ट को-जनरेशन मॅनेजर पुरस्कार जाहीर झाल्याचे महासंचालक संजय खताळ यांनी पत्राद्वारे कळविले.

Kolhapur Bidri Factory
Kolhapur Drought Condition : कोल्हापुरलाही दुष्काळाच्या झळा बसणार? ऑगस्टमध्ये फक्त २७ टक्के पाऊस

१६ सप्टेंबरला पुण्यात माजी कृषीमंत्री खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि को-जन इंडियाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण होणार आहे. अध्यक्ष के. पी. पाटील व संचालक मंडळ, प्रशासन कार्यकारी संचालक के. एस. चौगले, को-जन मॅनेजर व्ही. के. मिरजी यांचे मार्गदर्शन लाभले.

यावेळी बिद्री साखर कारखान्याचे चेअरमन के. पी. पाटील म्हणाले की, बिद्री कारखाना राष्ट्रीय पातळीवर सर्वोत्कृष्ट को जनरेशन पॉवर प्रथम क्रमांकाचा यंदा विशेष पुरस्कार मिळाला. सलग दुसऱ्या वर्षी असा पुरस्कार मिळविणारा बिद्री कारखाना देशातील एकमेव आहे. पुरस्कार सभासद, अधिकारी व कर्मचाऱ्यांना अर्पण करण्यात येत असल्याचे पाटील म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com