Rabi Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : अमरावतीत यंदा रब्बी क्षेत्रात होणार वाढ

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amaravati News : खरीप हंगामातील सोयाबीन बाजारात येऊ लागला असताना रब्बी हंगामाच्या नियोजनाची लगबग सुरू झाली आहे. यावर्षी रब्बी हंगामात गहू व हरभऱ्याचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.

गव्हाच्या क्षेत्रात ७ हजार ७९६ तर हरभऱ्याच्या क्षेत्रात २६ हजार २९० हेक्टरने वाढ होण्याचा अंदाज आहे. याशिवाय यंदा रब्बी ज्वारी व मक्याच्या क्षेत्रातही वाढ अपेक्षित करण्यात आली आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामात सरासरी १ लाख ८३ हजार ५४६ हेक्टर क्षेत्र आहे. यावर्षी त्यातील २ लाख १८ हजार ५८३ हेक्टरमध्ये पेरणी अपेक्षित करून कृषी विभागाने ८० हजार ७८३ क्विंटल बियाण्यांचे नियोजन केले आहे.

रब्बी हंगामात प्रामुख्याने गहू, हरभरा, मका व ज्वारीची पेरणी केली जाते. या सर्व पिकांच्या तुलनेत गहू व हरभऱ्याचे क्षेत्र अधिक राहणार आहे. या क्षेत्रासाठी ८० हजार ७८३ क्विंटल बियाण्यांचे नियोजन करण्यात आले असून गव्हासाठी २४ हजार ७८३ तर हरभऱ्यासाठी ५५ हजार ६२१ क्विंटल बियाण्यांची गरज भासणार आहे.

गव्हासाठी सार्वजनिक क्षेत्रातून ७ हजार २००, खासगी विक्रेत्यांकडून ११ हजार ४८२ व ‘महाबीज’कडून ६ हजार १००, तर हरभऱ्यासाठी सार्वजनिक २० हजार ८८०, खासगी १८ हजार १६१ व ‘महाबीज’कडून १६ हजार ५८० क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे.

यंदा पावसाच्या सरासरीत तूट असली तरी जुलै व सप्टेंबरमधील पावसाने धरणांतील जलसाठा वाढला आहे. याशिवाय विहिरी व भूगर्भातही पाणीसाठा असल्याने जमिनीत ओलावा आहे. त्याचा लाभ रब्बी हंगामास होणार आहे. जुलैतील अतिवृष्टीने सोयाबीन पिकाची हानी झाल्याने त्या क्षेत्रात रब्बीची पेरणी अपेक्षित असल्याने यंदा या हंगामात पेरणीक्षेत्र वाढले आहे.

असे आहे नियोजन (क्षेत्र हेक्टरमध्ये)

पीक सरासरी क्षेत्र अपेक्षित पेरणी बियाणे (क्विंटल)

गहू ४४,४८१ ५३,३७७ २४,७८२

रब्बी ज्वारी ९९ १५० ६

हरभरा १३१४४८ १५७७३८ ५५,६२१

मका १२५८ १५१० १

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT