VNMKV Agrowon
ॲग्रो विशेष

Action Plan : शेतकऱ्यांच्या समस्यांची उकल करणारा कृती आराखडा असावा

VNMKV : कृषी विद्यापीठांनी विकसित केलेले विविध पिकांचे नवीन वाण, तंत्रज्ञान शिफारशी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

Team Agrowon

Parbhani News : कृषी विद्यापीठांनी विकसित केलेले विविध पिकांचे नवीन वाण, तंत्रज्ञान शिफारशी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या विस्तार कार्याचा शेतकऱ्यांच्या जीवनावर झालेल्या परिणामाचे विश्‍लेषण (इम्पॅक्ट अॅनालिसिस) करण्याची गरज आहे.

शेतीतील जोखीम व्यवस्थापन, पुनरुत्पादन शेती पद्धती, कार्बन शेती पद्धती या संकल्पना शेतकऱ्यांमध्ये रुजविणे आवश्यक आहे. आगामी वर्षभरात शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्यांची उकल करण्यासाठी आवश्यक त्याबाबींचा कृषी विज्ञान केंद्राच्या वार्षिक कृती आराखड्यात समावेश करावा लागेल असा सूर कृषी शास्त्रज्ञांनी गुरुवारी (ता. ७) आळविला.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचालनालयातर्फे मराठवाड्यातील कृषी विज्ञान केंद्रांची वार्षिक कृती आराखडा कार्यशाळा आयोजित केली होती.कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले.

विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. जगदीश जहागीरदार, प्राचार्य डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. जया बंगाळे, डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. गजेंद्र लोंढे, यंत्रशक्ती विभागाच्या संशोधक अभियंता डॉ. स्मिता सोळंकी, डॉ. राजेश कदम, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख आदी उपस्थित होते.

डॉ. इंद्र मणी म्हणाले, की शेतकऱ्यांची प्रगती ही कृषी विज्ञान केंद्रांची जबाबदारी व कर्तव्य आहे. शेतकऱ्यांपर्यंत शेतीमधील उत्पन्नाची जोखीम कमी करणारे तंत्रज्ञान पोहोचवावे. नवनवीन संकल्पनांवर आधारित प्रात्यक्षिके आयोजित करावीत. डॉ. गोखले म्हणाले, की वार्षिक कृती आराखडा कार्यशाळेस कृषी विज्ञान केंद्रांच्या सर्व विशेषज्ञांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे.

केवळ सोयाबीन, कपाशी नव्हे, तर उच्च मूल्य असलेली वैविध्यपूर्ण पीक पद्धतीचा प्रसार करावा. डॉ. बंगाळे म्हणाल्या, की महिला सशक्तीकरणासाठी कार्य करावे. डॉ. कदम म्हणाले, की कृषी विज्ञान केंद्रांनी संपर्कातील शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठाच्या उपक्रमात सहभागी करुन घेण्यासाठी प्रयत्न करावेत. डॉ. सोलंकी म्हणाल्या, की रुंद वरंब सरी तंत्रज्ञानच्या परिणामांचे विश्‍लेषण करावे. डॉ. क्षीरसागर म्हणाले, की इनक्युबेशन सेंटरमधील गूळ निर्मितीचे तंत्रज्ञानाचा प्रसार करावा. डॉ. देशमुख म्हणाले, की कृषी विज्ञान केंद्र, उद्योजक, शेतकरी यांनी एकत्र येण्याची गरज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar Meets PM Modi: शरद पवार, सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, अचानक भेटीमुळे राजकीय वतुर्ळात चर्चा, नेमकं कारण काय?

Modern Fruit Plantation: फळझाडे लागवडीसाठी आधुनिक यंत्रे

Agriculture Machinery: जुन्या रिक्षा इंजिनापासून बहुउपयोगी कृषी यंत्र

Enterotoxemia In Goats: पावसाळ्यात शेळ्या-मेंढ्यांमध्ये आंत्रविषाराचा धोका, वेळीच करा प्रतिबंध

Jowar Procurement Scam: हमीभावाने ज्वारी खरेदीमध्ये गैरव्यवहार

SCROLL FOR NEXT