Sugarcane Labor Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Labor Shortage : यंदा ऊसतोडीसाठी मजूर टंचाईची शक्यता कमी

Sugarcane Season : यंदाच्या साखर हंगामात मजुरांची समस्या फारशी भेडसावण्याची शक्यता कमी आहे. यंदा सरासरी केवळ शंभर दिवसांचा गाळप हंगाम असल्‍याचा अंदाज आहे.

Raj Chougule

Kolhapur News : यंदाच्या साखर हंगामात मजुरांची समस्या फारशी भेडसावण्याची शक्यता कमी आहे. यंदा सरासरी केवळ शंभर दिवसांचा गाळप हंगाम असल्‍याचा अंदाज आहे. त्यामुळे इतक्या कमी कालावधीसाठी मजूर कारखान्‍यांकडे येण्यास पसंती दाखवतील असे चित्र आहे.

राज्यात ज्या भागांतून ऊस तोड मजूर येतात, त्या जिल्ह्यांमध्ये यंदा फारसा चांगला पाऊस झाला नाही. मध्यंतरी काही प्रमाणात झालेल्या पावसामुळे पिके तग धरुन असली तरी जून, जुलैच्‍या पावसाच्या ओढीने पिकांची चांगली वाढ झाली नाही. यामुळे उत्पादनात मोठी घट अपेक्षित आहे. तर दुसरीकडे रब्बीसाठीही पुरेसा पाऊस नाही.

पाणीसाठाही झाला नाही. यामुळे अनेक ऊसतोडणी मजूर यंदा साखर कारखान्यांना उपलब्ध होतील, अशी शक्‍यता आहे. कमी कालावधी असला तरी मजूरांना आगाऊ रक्‍कम मात्र तेवढीच द्यावी लागणार आहे. त्यामुळे कारखान्यांना मात्र कमी हंगामाचा फटका मजुरीकडूनही बसणार आहे.

राज्‍यात विविध कारखान्यांना सुमारे १२ ते १५ लाख इतके मजूर लागतात. मजूरांना गाळप हंगाम सुरु होण्‍यापूर्वीच काही महिने अगोदर आगाऊ रक्कम देवून मजुरांची जुळवाजुळव करावी लागते. सर्वाधिक मजूर बीड, यानंतर नगर जिल्ह्यातून कारखान्यांना उपलब्ध होतात.

यानंतर नंदुरबार, धुळे, जळगाव, नांदेड, धाराशिव, परभणी, सोलापूरमधला काही भाग व अलीकडच्या काळात सांगली जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील मजूरही येतात. राज्यभर सर्वत्र चांगला पाऊस झाला आणि पिकांची चांगली स्थिती असली तर अनेक मजूर उसतोडणीपेक्षा शेतीला प्राधान्य देतात.

अन्यथा नजीकच्या कारखान्‍यांकडे ऊस तोडणीला प्राधान्‍य देतात. गेल्या हंगामात अनेक कारखान्यांनी ऊस तोडणी यंत्राला प्राधान्‍य दिले. पण हंगाम कमी चालल्याने मजुरांची टंचाई जाणवली नाही.

यंदाही फारशी वेगळी परिस्थिती राहणार नसल्याचे कारखान्यांच्या ऊस विकास विभागाच्या प्रतिनिधींनी सांगितले. अनेकदा हंगाम लांबला की मजूर गावी जाण्यासाठी धडपडतात. यामुळे हंगामाच्या शेवटी मजूर मिळविण्यासाठी कारखान्यांना धावपळ करावी लागते. यंदाचा हंगाम १ नोव्‍हेंबरला सुरु होईल, असे गृहीत धरल्‍यास जानेवारीच्या शेवटच्या किंवा फेब्रुवारीच्या पहिल्‍या आठवड्यापर्यंत हंगाम चालेल, अशी शक्यता आहे.

संभाव्य संपाकडे लक्ष

यंदाच्या गळीत हंगामात ऊस तोडणी मजूर, मुकादम आणि वाहतूक संघटनांनी दरवाढीसाठी एक नोव्हेंबरपासून संपाचा इशारा दिला आहे. राज्यात केन हार्वेस्टरप्रमाणे ऊसतोडणी मजूरांना प्रतिटन ४०० रुपये दर मिळावा, यासह इतर मागण्यांसाठी ऊस तोडणी मजूर संघटनांनी आंदोलनाची हाक दिली आहे.

सध्या या मजुरांना प्रतिटन २७३ रुपये मजुरी मिळते. मात्र, गुजरात, तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडूत सरासरी ४०० रुपये प्रतिटन दर मिळत आहे. महाराष्ट्रात हार्वेस्टरला ४०० रुपये दर दिला जातो. तेवढाच दर ऊसतोडणी मजूरांना मिळावा, अशी मागणी केली आहे. हा संप जर झाला, तर मात्र कारखान्यांना अडचणी येऊ शकतात, अशी शक्‍यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Projects: पाडळसे, बलून बंधाऱ्यांना निधी केव्हा?

Agri Value Chain: शेतकरी, ग्राहकांशी जोडून घेणे गरजेचे

Khamgaon APMC: खामगाव बाजार समितीला बुधवारी मिळणार नवा सभापती

Livestock Feed: सकस चाऱ्यासाठी ओट

PM Kisan Installment : पीएम किसानच्या २१ हप्त्यासाठी राज्यातील ६ लाखांहून अधिक शेतकरी वगळले?

SCROLL FOR NEXT