Cotton Picking  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Mechanization : यांत्रिकिकरणाशिवाय कापूस पिकात पर्याय नाही

Demonstration of Cotton Picking : कापूस वेचणीसाठी मजुरांची समस्या वाढली आहे. कापूस उत्पादनाचा खर्चही दर वर्षी वाढतो आहे. अशा परिस्थितीत हे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना टिकवून ठेवण्यासाठी सुलभ यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय नाही.

Team Agrowon

Akola News : कापूस वेचणीसाठी मजुरांची समस्या वाढली आहे. कापूस उत्पादनाचा खर्चही दर वर्षी वाढतो आहे. अशा परिस्थितीत हे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना टिकवून ठेवण्यासाठी सुलभ यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय नाही, अशा प्रकारचे मत बाळापूर तालुक्यातील मालवाडा येथे झालेल्या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केले.

बियाणे उत्पादक कंपनी व शासनाच्या विविध विभागांच्या पुढाकाराने यंत्राद्वारे कापूस वेचणी प्रात्यक्षिक प्रयोगाचे मंगळवारी (ता. ६) दुपारी आयोजन करण्यात आले होते. या वेळी झालेल्या कार्यक्रमाला केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद, डॉ. एल. ए. वाघमारे, श्रीकॉटचे संचालक एस. के. शुक्ला,

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, कापूस संशोधन विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. सुरेंद्र देशमुख, कापूस अभ्यासक गोविंदराव वैराळे, बी. डी. जडे, विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, सीसीआयचे व्यवस्थापक निरजकुमार, अर्जुन तायडे, श्री. मेश्राम, विजय आरू, सुनील महाजन आदींची व्यासपिठावर उपस्थिती होती.

प्रमुख मार्गदर्शक वाय. जी. प्रसाद यांनी सघन कापूस लागवड मोहिमेचा आढावा घेताना सांगितले, की आज कापूस उत्पादनात वेचणीवरील खर्चच ३२ टक्क्यांपर्यंत पोचला आहे. वेचणीसाठी मजुरांची समस्या बिकट होत आहे. दिवसेंदिवस कापूस उत्पादन कमी होत असल्याने लागवडीचे क्षेत्र घटत चालले. अशा विविध बाबी लक्षात घेता कापूस उत्पादन वाढ गरजेची आहे.

सघन कापूस लागवडीचे मॉडेल

१२ वर्षांपूर्वी तयार झाले असून नॉनबीटी वाणावर सुरुवात केली होती. या वर्षी देशातील ८ राज्यांत १० हजार शेतकरी यात सहभागी झाल्याने ९ हजार हेक्टरवर सघन पद्धतीने कापूस पिकवण्यात आला. याचे यश पाहून खासगी बियाणे कंपन्या या पद्धतीला आवश्यक वाण तयार करीत आहेत.

येत्या दोन-तीन वर्षांत यासाठी मुबलक बियाणे मिळेल. येत्या पाच वर्षांत यांत्रिक पद्धतीने वेचणीकडे जावे लागेल असेही श्री. प्रसाद म्हणाले. यावेळी डॉ. वाघमारे, किशोर वाघ यांनीही मनोगत व्यक्त केले. शेतकरी दिलीप ठाकरे यांनी प्रास्ताविकात सघन कापूस लागवड प्रयोगाबाबतची भूमिका मांडली. उमेश भगत यांनी सूत्रसंचालन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Death : रानडुकरासाठीच्या तारकुंपणातील विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

Crop Loan : उद्दिष्टाच्या ५० टक्केच पीककर्ज वितरित

Soybean Pest Control: सोयाबीनवर हुमणी आणि पाने खाणाऱ्या अळीचा हल्ला! शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक उपाय

Rain Update : जतमध्ये पावसाने पिकांना नवसंजीवनी

Vice President Election: जे.पी. नड्डा उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे अधिकृत उमेदवार; एनडीएच्या बैठकीत शिक्कामोर्तब

SCROLL FOR NEXT