Team Agrowon
अमेरिकेसह प्रगत राष्ट्रांमध्ये कापूस वेचणीनंतर शेतातच त्याचे प्रेसिंग केले जाते. असा कापूस नंतर उपलब्ध दोराच्या साहाय्याने बांधला जातो. त्याकरिता स्टील पट्ट्यांचाही वापर होतो.
अमेरिकन शेतकऱ्यांचे कापसाखालील क्षेत्र मोठे राहते. परिणामी, त्या ठिकाणी अशाप्रकारे प्रेसिंग केलेल्या कापसाचे बंडल सरासरी पाच टन राहते
कापूस शेतातून इतर ठिकाणी हलविण्याकरिता खास संयंत्राचा वापर होतो. अशा प्रेसिंग केलेल्या कापसात कचरा मिसळण्याची भीती राहत नाही व कापसाचा दर्जा राखता येतो.
अमेरिकन कॉटन मॉड्यूल हे पाच टन असले तरी भारतीय शेतकऱ्यांकडे जमीनधारणा कमी आहे.
परिणामी साधारणतः तीस किलोचे मॉड्यूल असावे असा विचार आहे. तीस किलोचे मॉड्यूल असल्यास ते हाताळणे सहज शक्य होईल.
त्याकरिता लागणारी प्रेसिंग यंत्रणा व इतर बाबींवर संस्था काम करीत आहे.
सध्या देशात कापसात मिसळणाऱ्या प्लॅस्टिकला वेगळे करण्याचे आव्हान आहे. त्यामुळे कापसाची प्रत बिघडते, त्यावर हा उपाय परिणामकारक ठरणार आहे.