Fodder Shortage  Agrowon
ॲग्रो विशेष

Fodder Shortage : नगर जिल्ह्यात पावसाळ्यापर्यंत पुरेल एवढा चारा शिल्लक

Fodder Issue : नगर जिल्ह्यात यंदा बहुतांश भागात दुष्काळी स्थिती आहे. मात्र संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाने पाणी उपलब्ध असलेल्या भागात शेतकऱ्यांमार्फत चारा उत्पादन घेतले.

सुर्यकांत नेटके

Nagar News : नगर जिल्ह्यात यंदा बहुतांश भागात दुष्काळी स्थिती आहे. मात्र संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाने पाणी उपलब्ध असलेल्या भागात शेतकऱ्यांमार्फत चारा उत्पादन घेतले. शिवाय शेतकऱ्यांनीही चारा देणाऱ्या पिकांची अधिक पेरणी करण्यावर भर दिला. त्याचा परिणाम म्हणून यंदा चारा टंचाईवर मात करता आली आहे, असा दावा पशुसंवर्धन विभागाने केला. सध्या उसासह अन्य मिळून २५ हजार टन चारा विक्रीसाठी उपलब्ध आहे.

नगर जिल्ह्यातील १६०२ गावांत १३ लाख १६ हजार ६४२ मोठे, २ लाख ८३ हजार लहान, १५ लाख शेळ्या-मेंढ्या आहेत. पंधरा आणि साडेसात किलो, तसेच शेळ्या मेढ्यांमा साधारण तीन किलोचा विचार करता २७ हजार ८२४ किलो हिरवा व ११ हजार ६०५ किलो वाळलेला चारा दर दिवसाला लागतो.

यंदा दुष्काळी स्थिती असल्यामुळे जिल्ह्यात खरीप, रब्बी तसेच उन्हाळी पिकांतून उपलब्ध होणारा चारा आणि पशुसंवर्धन विभागाने ज्या भागात चांगल्या प्रकारे पाणी उपलब्ध आहे तेथे चारा उत्पादन घेण्यासाठी जिल्हाभरात १० हजार ८०० शेतकऱ्यांना १ लाख २५ हजार ४९० किलो मका व बाजरीचे मोफत बियाणेवाटप केले.

१ लाख ६४ हजार ५८७ टन चारा उपलब्ध झाला. खरीप, रब्बी व अन्य मार्गाने २२ लाख ७ हजार ९५४ टन, मुरघासातून साडे चार लाख टन, असा ३३ लाख ३० हजार ८२३ टन हिरवा जिल्ह्यात उपलब्ध झाला आहे. याशिवाय १४ लाख ४६ हजार ४७७ टन वाळलेला चारा उपलब्ध होत आहे. उन्हाळी हंगामातून १४ लाख ७६ हजार ७४७ टन चारा मिळाला.

चारा विक्रीसाठी उपलब्ध

नगर जिल्ह्यात एप्रिलच्या अखेरीस पशुसंवर्धन विभागाने घेतलेल्या आढाव्यानुसार ५४ लाख ७१ हजार १४६ टन चारा उपलब्ध होता. हा चारा यंदा पावसाळ्यापर्यंत पुरेल. यंदा चारा उपलब्धतेचे नियोजन केल्यामुळे चाराटंचाई निर्माण झाली नाही. अकोले तालुक्यातील पशुधानाची संख्या पाहता येथे सर्वाधिक चारा आहे. सध्या नगर जिल्ह्यातील ३५९ शेतकऱ्यांकडे २५ हजार ४४६ टन चारा विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यात प्रामुख्याने १० हजार ७६२ टन ऊस, आडीच हजार टन मका, २५५ टन कडवळ, २३६ टन कडबा, ११ हजार ३९५ टन मुरघास व इतर ३८१ टन चाऱ्याचा समावेश आहे, असे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Scheme : बिगर कर्जदार शेतकऱ्यांना विमा अर्जासाठी अंतिम मुदत

Crop Insurance Payment : विमा परतावा खात्यात जमा होण्यास नांदेडमध्ये सुरुवात

NAFED Onion Scam : कांदा उत्पादकांना न्याय मिळेपर्यंत लढा देणार

Rain Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे जोरदार कमबॅक

Kharif Sowing : सोयाबीन, सूर्यफूल क्षेत्रात घट

SCROLL FOR NEXT