Fodder Update : लातूर-धाराशिव जिल्ह्यांत यंदा चाराटंचाई नाही

Drought Condition : लातूर व धाराशिव दोन्ही जिल्ह्यांत पाणीटंचाईची तीव्रता वाढली असली तरी जनावरांसाठी आवश्यक असलेला चारा पुरेशा प्रमाणित आहे.
Fodder Shortage Update
Fodder Shortage UpdateAgrowon
Published on
Updated on

Latur News : लातूर व धाराशिव दोन्ही जिल्ह्यांत पाणीटंचाईची तीव्रता वाढली असली तरी जनावरांसाठी आवश्यक असलेला चारा पुरेशा प्रमाणित आहे. लातूर जिल्ह्यात अकरा लाख मेट्रिक, तर धाराशिव जिल्ह्यात सव्वातीन लाख मेट्रीक टन चारा शिल्लक आहे. शिल्लक चाऱ्याचा विचार केल्यास लातूर जिल्ह्यातील जनावरांना हा चारा २४ जूनपर्यंत पुरवणी येऊ शकतो,

तर धाराशिव जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंतचा चारा उपलब्ध आहे. बाहेरच्या जिल्ह्यात चारा विक्रीस बंदी आहे. यामुळे दोन्ही जिल्ह्यांत पावसाळा सुरू होईपर्यंत चाराटंचाई शक्यता नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

लातूर जिल्ह्यात विसाव्या पशुगणनेनुसार सहा लाख ९८ हजार ३८६ विविध प्रकारची जनावरे असून, यात दोन लाख ५६ हजार १८० गायी, दोन लाख ५५ हजार ४७० बैल, ३५ हजार ४५ म्हैस, एक लाख ४८ हजार ९१९ शेळ्या व मेंढ्या आहेत.

या जनावरांसाठी दररोज दोन लाख ८०९ मेट्रिक टन चाऱ्याची आश्यक असून सध्या विविध मार्गांनी ११ लाख आठ हजार ९३६ मेट्रिक टन शिल्लक आहे. यात वनक्षेत्रातील वैरण, गवती कुरण, चराऊ क्षेत्रातील वैरण, बांध क्षेत्रातील वैरण व पडीक क्षेत्रातील वैरणीपासून ३३ हजार ९१२ मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे.

Fodder Shortage Update
Drought Condition : जिवापाड जपलेल्या फळबागांवर कुऱ्हाड

शेतीपिकांच्या दुय्यम उत्पादनापासून पाच लाख ४५ हजार ६३४ मेट्रिक टन वैरण उपलब्ध आहे. वैरण पिकांपासून तीन लाख २१ हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध होणार असून, पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांतून दोन लाख आठ हजार ३९० मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे.

योजनेतून वैरण बियाणे व ठोंबे वितरणासाठी विभागाने दीड कोटीच्या निधीचे वाटप केल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रांनी दिली. उपलब्ध चारा व दररोज लागणाऱ्या चाऱ्याचे गणित घातल्यानंतर जिल्ह्यातील जनावरांना येत्या २४ जूनपर्यंत चारा पुरेल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. यामुळे एकीकडे तीव्र पाणीटंचाई भासत असली तरी जिल्ह्यात चाराटंचाई नसल्याचे दिसून येत आहे.

Fodder Shortage Update
Fodder Shortage : चाऱ्या अभावी जनावरे जगविण्याचे आव्हान

धाराशिव जिल्ह्यात विसाव्या पशुगणनेनुसार सात लाख ९० हजार ३९३ जनावरे असून यात चार लाख ३१ हजार ३५ मोठी, एक लाख १९ हजार ८३२ लहान तर दोन लाख ३९ हजार ५२६ शेळ्या व मेंढ्याचा समावेश आहे. या जनावरांसाठी दररोज तीन हजार ८९ मेट्रिक टन चारा आवश्यक असून, जिल्ह्यात विविध मार्गांनी तीन लाख २४ हजार ३४५ मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे.

मेअखेरपर्यंत २७ हजार ८०१ मेट्रिक टन चाऱ्याची आवश्यकता आहे. उपलब्ध चारा व दररोज आवश्यक चारा लक्षात घेता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चारा उपलब्ध असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे धाराशिवमध्येही चाराटंचाईची शक्यता नसल्याचे दिसत आहे.

रब्बी हंगामात उशिरा पाऊस झाल्यामुळे हरभऱ्याचे पीक शेतकऱ्यांच्या हाती लागले नाही. यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ज्वारीचे पीक घेतले. यात ज्वारीचे उत्पादन जास्त झाले नाही तरी कडब्याच्या माध्यमातून चारा उपलब्ध झाला. पशुसंवर्धन विभागाने विविध योजनांतून ५० टन चारा बियाण्यांचे वाटप शेतकऱ्यांना केले. उपलब्ध चाऱ्याची स्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील चारा बाहेरच्या जिल्ह्यात विक्री व वाहतुकीसाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी बंदी घातली. यामुळे जिल्ह्यातील चारा जिल्ह्यातच उपलब्ध होऊन चाराटंचाई रोखण्यात मदत झाली आहे.
डॉ. श्रीधर शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, लातूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com