Water Stock
Water Stock Agrowon
ॲग्रो विशेष

Water Stock In Buldana : बुलडाण्यातील जलाशयात ३९ टक्के पाणीसाठा शिल्लक

Team Agrowon

Buldana News : उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून काही ठिकाणी पाणीटंचाईच्या (Water shortage) झळा जाणवू लागल्या आहेत. मात्र, दुसरीकडे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये सरासरी ३९ टक्के साठा सध्याही उपलब्ध आहे. त्यामुळे यंदा टंचाईची तीव्रता कमी राहील, असा अंदाज व्यक्त होत आहे.

गेल्या वर्षात दमदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघू, अशा सर्वच प्रकल्पांमध्ये मुबलक साठा तयार झाला होता. सिंचनासाठीही पाणी उपलब्ध झाले. आजही नळगंगा, खडकपूर्णा, पेनटाकळी यासारख्या मोठ्या प्रकल्पात सुमारे ३७ टक्के साठा आहे.

मोताळा तालुक्यातील नळगंगा प्रकल्पात २३.७३ दलघमी (३४.२३ टक्के), देऊळगावराजा तालुक्यातील खडकपूर्णा प्रकल्पात २६.८२ दलघमी (२८.७२ टक्के) तर मेहकरमधील पेनटाकळी प्रकल्पात सर्वाधिक ३२.७९ दलघमी (५४.६८ टक्के) साठा शिल्लक आहे.

मध्यम प्रकल्पांचा विचार केल्यास ज्ञानगंगा प्रकल्पात २४.०५ दलघमी (७०.८८ टक्के), मस प्रकल्पात ७.१८ दलघमी (४७.७४ टक्के), कोराडी प्रकल्प ११.८५ दलघमी (७८.३७ टक्के), मन प्रकल्प १७.५० दलघमी (४७.५० टक्के), उतावळी प्रकल्प ७.७८ दलघमी (३९.३१ टक्के) साठा आहे.

लघु प्रकल्पांमध्ये सध्या बऱ्यापैकी जलसाठा असल्याने जनावरांची पिण्याच्या पाण्याची सोय झालेली आहे. विविध पाणीपुरवठा योजनांचेही स्रोत यंदा जिवंत आहेत. एप्रिल, मे तसेच अर्धा जून महिना रखरखत्या उन्हाचा राहतो. या काळात पाण्याची मागणी वाढलेली असते.

यंदा प्रकल्प भरलेले असल्याने पाणीटंचाईची तीव्रता कमी राहण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी मात्र, आतापासूनच टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे.

उन्हाळी सिंचनासाठी पाणी

यंदा प्रकल्प भरलेले असल्याने रब्बी पाठोपाठ उन्हाळी हंगामासाठी पाणी मिळत आहे. रब्बीत गहू, हरभरा पिकाचे सिंचन शेतकरी करू शकले. काही शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांचीही लागवड केली आहे.

यासाठीही उपलब्ध असलेल्या साठ्यातील पाणी काही प्रकल्पातून उपलब्ध करून देण्यात आले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

Agriculture Success Story : नैसर्गिक उमाळ्यावर फुलली शेती, बहरले पर्यटन

Horticulture : ‘कोठली’ला मिळाला बागायती चेहरा

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

SCROLL FOR NEXT