Food Security Agrowon
ॲग्रो विशेष

Food Security : जगाला मिळावी शाश्वत अन्नसुरक्षा...

जागतिक अन्न दिन साजरा केल्याने प्रभावी कृषी आणि अन्न धोरणांच्या महत्त्वाच्या गरजांबद्दल जागरूकता पसरविण्यास मदत होते. शाश्वत कृषी अन्न प्रणाली भविष्यातील पिढ्यांसाठी अन्न सुरक्षा आणि पोषण सुनिश्चित करते. शाश्वत कृषी अन्न प्रणालीमध्ये, प्रत्येकाला परवडणारे, पौष्टिक आणि सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध आहेत.

टीम ॲग्रोवन

नारायण सरकटे

दरवर्षी १६ ऑक्टोबर रोजी जागतिक अन्न दिन (World Food Day) साजरा केला जातो. भूक आणि आरोग्यदायी आहाराच्या (Healthy Diet) सवयीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. १६ ऑक्टोबर हा दिवस जागतिक अन्न (Global Food) आणि कृषी संघटनेचा स्थापना दिवस आहे. भूक (Hungar), कुपोषण (Malnutrition), शाश्वतता आणि अन्न उत्पादन (Food Production) याविषयी जागरूकता वाढवण्यासाठी हा चांगला मार्ग तयार झाला आहे. जागतिक अन्न कार्यक्रम (Global Food Program), अन्न सुरक्षा (Food Security), कृषी विकासासाठी आंतरराष्ट्रीय निधी आणि इतर अनेक संस्थांसह हा दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.

जागतिक अन्न दिनाचे महत्त्व ः

दरवर्षी संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटना स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त जागतिक अन्न दिन साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट जागतिक भुकेचा सामना करणे आणि जगभरातील भूक निर्मूलनासाठी प्रयत्न करणे हा आहे. २०२१ च्या ‘ग्लोबल हंगर इंडेक्स'मध्ये भारत देश ११७ देशांपैकी १०१ व्या क्रमांकावर आहे. हे नायजरच्या अगदी खाली आणि सिएरा लिओनच्या वरचे स्थान आहे.

जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेला आणि जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला भारत देश जगातील एक चतुर्थांश कुपोषित लोकांचे घर आहे. आर्थिक वाढ असूनही, भारत अजूनही उच्च पातळीवरील गरिबी, अन्न असुरक्षितता आणि कुपोषणाने त्रस्त आहे. गेल्या दोन दशकांत श्रीमंत आणि गरीब यांच्यातील उत्पन्नातील दरी वाढली आहे.

परिस्थितीचा सामना करण्यासाठी, जागतिक अन्न कार्यक्रम भारत सरकारसह अनेक पावले उचलत आहे. भारत सरकार देखील अन्न सुरक्षा संबंधी अनेक योजना राबवत आहे परंतु अंमलबजावणी करणे हे एक आव्हान आहे. सरकारने २०१३ मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा लागू केला होता.

यामुळे भारतीय लोकसंख्येच्या अंदाजे दोन तृतीयांश लोकांना अनुदानित दराने अन्नधान्य मिळण्याची हमी दिली होती. कोरोना साथीमुळे अन्नसाखळी विकसित करताना वेगळ्या दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. वाढत्या लोकसंख्येच्यादृष्टीने अन्न बँकांची गरज भासत आहे. २०४० पर्यंत ९० अब्ज लोकांना अन्न पुरवू शकतील अशा कृषी अन्न प्रणालींची गरज आहे.

जागतिक अन्न दिन साजरा करण्यामागील उद्देश हा आहे की, जगभरात विशेषत: संकटात अन्न सुरक्षा मिळावी. संयुक्त राष्ट्रसंघाने अन्न आणि कृषी संघटनेने घेतलेल्या पुढाकाराने हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जागतिक अन्न दिन साजरा केल्याने प्रभावी कृषी आणि अन्न धोरणांच्या महत्त्वाच्या गरजांबद्दल जागरूकता पसरविण्यास मदत होते.

यंदाचे घोषवाक्य ः

आपण सतत साथीचे आजार, हिंसाचार आणि न थांबवता येणाऱ्या तापमानवाढीचा सामना करणार आहोत. वाढत्या किमती आणि आंतरराष्ट्रीय तणाव यांचा जागतिक अन्न सुरक्षेवर नकारात्मक परिणाम होतो. आपण असे जग निर्माण केले पाहिजे जिथे प्रत्येकाला, सर्वत्र, पुरेसे पौष्टिक अन्न नियमितपणे उपलब्ध असेल.

त्यामुळे भविष्यातील गरज लक्षात घेऊन लोकांच्यामध्ये जागृती करण्यासाठी यावर्षीचे घोषवाक्य हे ‘मागे कोणीही राहू नये ( Leave NO ONE behind) असे आहे. शाश्वत कृषी अन्न प्रणाली भविष्यातील पिढ्यांसाठी अन्न सुरक्षा आणि पोषण सुनिश्चित करते. शाश्वत कृषी अन्न प्रणालीमध्ये, प्रत्येकाला परवडणारे, पौष्टिक आणि सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध आहेत. अन्न पुरवठा साखळीवर बदलते हवामान, किमतीत वाढ किंवा साथीच्या आजारांचा परिणाम होत आहे.

संपर्क ः नारायण सरकटे,७५८८६४९२९६

(सहायक आयुक्त (अन्न) तथा पदावधीत अधिकारी, अन्न व औषध प्रशासन,परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Food Processing Industry : ‘माऊली’ ब्रॅंड उत्पादनांचा होतोय विस्तार

Mango Orchard Management : आंबा मोहोरताना घ्यावयाची काळजी

Postal Votes : पोस्टल मतांनी पटोलेंना तारले

Maharashtra Assembly Election Result 2024 : विदर्भात महायुतीला स्पष्ट कौल, तर महाविकास आघाडीला नाकारले

Jharkhand Assembly Election Result : झारखंडमध्ये पुन्हा हेमंत सोरेन सरकार

SCROLL FOR NEXT