Jayakwadi Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Jayakawadi Water Storage : जायकवाडीचा पाणीसाठा स्थिर; प्रकल्प जवळपास तुडुंबच

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील सर्वांत मोठ्या जायकवाडी प्रकल्पातील पाणीसाठा गतकाही दिवसांपासून ९९.४५ टक्क्यांवर स्थिर करण्यात आला आहे. प्रकल्प जवळपास तुडुंबच असून, येत असलेल्या आवकेतून जवळपास निम्मा विसर्ग माजलगाव प्रकल्पासाठी उजव्या कालव्यातून सोडला जातो आहे.

जायकवाडी प्रकल्पाची पाणीसाठा क्षमता १०२.७३ टीएमसी इतकी आहे प्रकल्पात ७६.२४ टीएमसी जिवंत, तर १०२.३० टीएमसी एकूण पाणीसाठा झाला आहे. प्रकल्पात शुक्रवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास ११३४ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती.

तर जवळपास तुडुंब असलेल्या या प्रकल्पातून माजलगाव प्रकल्पाकरिता ६५० क्युसेकने सुरू असलेला पाण्याचा विसर्ग शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारासही कायम होता. प्रकल्पातील पाणीसाठा काही दिवसांपासून ९९.४५ टक्क्यांवर स्थिर आहे. गतवर्षी आजच्याच दिवशी प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ३३ इतकी होती.

आवर्तनाची आली शाश्‍वती

यंदा जायकवाडी प्रकल्प तुडुंब झाल्याने रब्बी व उन्हाळी आवर्तनासह पिण्याच्या पाण्याची शाश्‍वती आली आहे. प्रकल्पावरून जवळपास २० शहरी व ग्रामीण पिण्याच्या पाणीपुरवठा योजना तसेच ७ औद्योगिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. जायकवाडी प्रकल्पावर साधारणतः १ लाख ८३ हजार हेक्टरवर सिंचन होणे अपेक्षित आहे.

या सिंचनासाठी रब्बीत तीन व उन्हाळी चार अशी एकूण सात आवर्तने यंदा हमखास मिळतील याची अपेक्षा आहे. साधारणतः प्रत्येकी २५ दिवसांची ही आवर्तने असतील. रब्बीचे आवर्तन डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत व उन्हाळी आवर्तन मार्च ते जून या कालावधीत सोडले जाईल. १५ ऑक्टोबरनंतर आवर्तनाच्या नियोजनाविषयी कालवा समिती बैठकीनंतर स्पष्टता होईल.

आजवर आले ७९ टीएमसी पाणी

जायकवाडी प्रकल्पात नगर, नाशिक भागांत झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरीच्या माध्यमातून १ जूनपासून आतापर्यंत जवळपास ७९.९९ टीएमसी पाणी आले. गतवर्षी प्रकल्प निम्माही भरला नाही, त्यामुळे आलेल्या या पाण्यापैकी ६७.६७९७ दलघमी म्हणजे २.३९ टीएमसी पाणीच आतापर्यंत सोडण्याची गरज पडली. आता पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तविला आहे. पाऊस आला आणि आवक वाढली तर पुन्हा एकदा प्रकल्पाच्या दरवाजातून गोदावरीच्या पात्रात विसर्ग करण्याचा निर्णय केला जाऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Harvesting : सोयाबीनची उंची वाढली, उत्पन्न कमीच

Irrigation Subsidy : सिंचन अनुदान रखडल्याने आर्थिक संकट

Farmers Issue : कृषी विभागाचे नियंत्रण नसल्याने शेतकरी नडला जातोय

Sangli APMC : व्यापारी, हमाल वादावर तोडगा काढण्यासाठी समिती

Nuksan Bharpai : १८ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अवकाळी व अतिवृष्टिचा मदत निधी

SCROLL FOR NEXT