Low Water Storage in Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Dam Water Storage : अहमदनगरमधील धरणांत पाणीसाठा कमीच

District Dam Water Update : अहमदनगर जिल्ह्यात उत्तरेतील भंडारदरा, निळवंडे धरण वगळता यंदा अन्य धरणांत दरवर्षीच्या तुलनेत कमीच पाणीसाठा आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे.

Team Agrowon

Nagar News : अहमदनगर जिल्ह्यात उत्तरेतील भंडारदरा, निळवंडे धरण वगळता यंदा अन्य धरणांत दरवर्षीच्या तुलनेत कमीच पाणीसाठा आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. विशेष म्हणजे घाटमाथ्यावर अधिक प्रमाणात पाऊस पडत असतो. त्या पाणलोटातीलही धरणे शंभर टक्के भरली नाहीत.

'ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

यंदा सुरुवातीपासूनच पाऊस नाही. शेतकऱ्यांनी अपुऱ्या पावसावर खरीप पेरणी केली, पण त्यातही मध्यंतरीच्या काळात सुमारे एक महिन्यापेक्षा अधिक काळ खंड दिला. त्याचा परिणाम पिकाच्या उत्पादनावर झाला, पण अनेक भागात पाऊस नसल्याने धरणे, मध्यम प्रकल्प, गाव तलाव, पाझर तलाव, नद्या कोरड्या आहेत.

अकोले तालुक्यातील पश्चिम भागात झालेल्या पावसामुळे उत्तरेतील भंडारदरा, निळवंडे पूर्ण क्षमतेने भरले. मात्र सव्वीस टीएमसी क्षमतेचे मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरू शकले नाही. भोजापुर दहा टक्के रिकामे आहे. जिल्ह्यातील काही धरणांच्या ओव्हर फ्लो पाण्याने भरण्याचा प्रयत्न होऊनही दक्षिणेतील सीनात तीस टक्के कमी पाणी आहे.

खैरी, विसापूर, माणिकडोह यातही अपुरा पाणीसाठा आहे. पाथर्डीतील बेलपारा मध्यम प्रकल्पातही पुरेसे पाणी नाही. घाटशिळपारगाव धरणात तर केवळ चार टक्के पाणी आहे. त्यामुळे यंदा शेतीशिवाय पिण्याचा पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे सध्या धरणे, गाव तलाव, पाझर तलाव, मध्यम प्रकल्प, लघू बंधारे यातून होणारा पाणी उपसा थांबवण्यासह उपलब्ध पाण्याच्या नियोजनाबाबत प्रशासन काय उपाययोजना करतेय याकडे लक्ष लागले आहे.

नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील यंदा कमी पाणीसाठा आहे. जायकवाडीतही पाणी कमीच आहे. त्यामुळे पुढील परिस्थितीचा विचार करून पिण्यासाठी, शेतीला वापरले जाणारे पाणी याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. पाणी जपण्यासाठी प्रत्येकांचे योगदान महत्त्वाचे राहणार आहे.
हरिचंद्र चकोर, सेवानिवृत्त अभियंता

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT