Ujani Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Ujan Water Level : ‘उजनी’तील पाणीपातळी ३२, तर जायकवाडीतील ४४ टक्क्यांवर

Water Storage In Dam : पुणे जिल्ह्याकडील धरणांतून उजनीकडे येणाऱ्या पाण्याचा विसर्ग अखंडपणे सुरू आहे. त्यामुळे उजनी धरणाची पाणीपातळी वेगाने वाढत आहे.

Team Agrowon

Solapur News : पुणे जिल्ह्याकडील धरणांतून उजनीकडे येणाऱ्या पाण्याचा विसर्ग अखंडपणे सुरू आहे. त्यामुळे उजनी धरणाची पाणीपातळी वेगाने वाढत आहे. शनिवारी (ता. ३०) धरणांतील पाण्याने ३२ टक्क्यांचा टप्पा ओलांडला. दहा दिवसांपूर्वी २२ टक्क्यांवर असणारी पाणीपातळी अवघ्या दहाच दिवसांत दहा टक्क्यांनी वाढली आहे.

यंदा जून, जुलै, ऑगस्ट आणि आता सप्टेंबरचा पावसाचा शेवटचा महिनाही संपला, पण अद्यापही जिल्ह्यात दमदार पाऊस झालेला नाही. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये किरकोळ पाऊस झाला. पण तो केवळ उरल्या-सुरल्या पिकांना जगविण्यासाठी उपयुक्त ठरला. पण अद्यापही विहिरी किंवा बोअरच्या पाणी पातळीत वाढ होण्यासारखा पाऊस झालेला नाही.

त्यात उजनी धरणाच्या कार्यक्षेत्रातही तुलनेने कमीच पाऊस झाला. त्यामुळे पाणीपातळी वाढली नसली, तरी कसेबसे धरण उणेतून अधिक पातळीत आले. पण पुढे पाणीपातळी काही हलत नव्हती. त्यामुळे चिंता व्यक्त होत असताना गेल्या आठवड्यात उजनी धरणाच्या वरच्या बाजूला असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा झाला.

त्यामुळे उजनी धरणाकडे पाण्याचा विसर्ग सोडला जात आहे. परिणामी, धरणातील पाणीपातळी वेगाने वाढत आहे. २० सप्टेंबरला धरणामध्ये २२.७५ टक्के पाणीसाठा होता, आज ३० सप्टेंबरला दहा दिवसांनी तो ३२.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या पाच दिवसांत धरणात साधारण ५ टीएमसी पेक्षाही अधिक पाणी आले आहे.

...तर धरण ५० टक्क्यांपर्यंत पोहोचणार

पुणे जिल्ह्याकडील धरणांतून ‘उजनी’मध्ये शनिवारी (ता. ३०) १५ हजार २९० क्युसेक पाणी सोडले जात होते. धरणांमध्ये सध्या एकूण पाणीपातळी ४९३.२५० मीटर इतकी राहिली, तर एकूण पाणीसाठा ८०.८३ टीएमसी आणि त्यापैकी उपयुक्त साठा १७.१७ टीएमसी एवढा राहिल्यास या पाण्याची टक्केवारी ३२.५ टक्के राहील. त्यामुळे पाण्याचा हा विसर्ग असाच कायम राहिल्यास, पुढच्या दहा दिवसांत धरण ५० टक्क्यांपर्यंत पोहोचेल, अशी शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Subsidy Delay: मंजुरीतील विलंबामुळे अनुदानात अडचणी

Raisin Season: बेदाणा हंगामाची पूर्वतयारी सुरू

Agrowon Study Tour: ‘अॅग्रोवन’तर्फे चीनमधील आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन अभ्यास दौऱ्याचे आयोजन

Maharashtra Wildlife: चिंकारांमुळे कळसला माळरानांच्या सौंदर्यात भर

Turmeric Rate: वाईत नवीन हळदीला २०२०० रुपये दर

SCROLL FOR NEXT