Buldana News: नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा टप्पा क्रमांक दोन राज्यांत सुरू झाला असून, शेतकऱ्यांमध्ये त्याबद्दल उत्सुकताही दिसून येत आहे. योजनेत असलेल्या गावांमधील शेतकऱ्यांनी कृषी खात्याच्या आवाहनानुसार अर्जही केले आहेत. मात्र हे अर्ज विविध स्तरांवर मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यात अडथळे येत असल्याचे दिसत आहे..योजनेतून शेतकरी ठिबक पद्धत, तुषार सिंचन पद्धत, पीव्हीसी पाइप, इलेक्ट्रिक पंप यांसारख्या आधुनिक कृषी साहित्यासाठी अर्ज करीत आहेत. विशेष म्हणजे, अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांना ८० टक्क्यांपर्यंत अनुदान प्राप्त करण्याची संधी मिळते. यामुळे या योजनेतून लाभासाठी अर्जांची संख्या वाढली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याचा अर्ज विविध टप्पे पार करून पुढे जातो..Krishi Project: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाला गती द्या; कुंभेजकर .या प्रक्रियेस काही तालुक्यांत जाणीवपूर्वक होत असलेल्या विलंबामुळे शेतकरी अनुदानाच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता वाढली आहे. योजनेचा कारभार पारदर्शक आणि सुटसुटीत ठेवण्यात आल्याचा दावा कृषी खात्याकडून केला जातो..Krushi Samruddhi Yojana : ‘कृषी समृद्धी’त ४८.९८ कोटी रुपयांचा लक्षांक.शेतकऱ्याला अर्ज सादर केल्यानंतर प्रत्येक टप्प्याची माहिती वेळोवेळी देण्याची सोयही झालेली आहे. यामुळे शेतकऱ्याला कृषी विभागाच्या पायऱ्या झिजवण्याची गरज नाही. तरीही काही अधिकारी जाणीवपूर्वक विलंब करत असल्याचे कृषी खात्यातील अधिकारी मान्य करतात. यामुळे तालुका पातळीवर अधिक प्रमाणात अर्ज साठून राहिले आहेत..कृषी संजीवनी प्रकल्पातील लाभाचे घटकवृक्ष लागवड, बांबू लागवड, फळबाग लागवड, ठिबक सिंचन संच, तुषार सिंचन संच, वैयक्तिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, शेडनेटगृह- हरितगृहामधील लागवड साहित्य, गांडूळ खत व नाडेप, विहीर पुनर्भरण, पाईप व पंप संच (अनुसूचित जाती- जमातीतील लाभार्थी), बीजोत्पादन, रेशीम उद्योग, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन, शेळीपालन (भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती, विधवा, परित्यक्ता व घटस्फोटित महिला).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.