Water Crisis  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Level : विहिरीतील पाण्याची पातळी खालावली

Water Crisis : बागलाण तालुक्यातील केरसाणेसह मुंगसे, पिंगळवाडे परिसरात विहिरीच्या पाण्याची पातळी खालावली आहे.

Team Agrowon

Nashik News : बागलाण तालुक्यातील केरसाणेसह मुंगसे, पिंगळवाडे परिसरात विहिरीच्या पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे अधिक पाण्यासाठी आणि कांदा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून विहीर खोदकामावर भर देत आहेत.

यामुळे ऐनवेळी विहीर खोदकामासाठी लागणाऱ्या क्रेन मशिनची शोधाशोध करावी लागत आहे. गतवर्षी पावसाळा जेमतेम झाल्याने ऐन उन्हाळ्यात व कांदा मोसमात असताना पाणी कमी पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

काही शेतकरी विहिरीत साचलेला गाळ काढण्याचे काम व आडवा बोर करून पाण्याची पातळी शोधत आहेत. ऐन मोसमात पाणी कमी झाल्याने शेतकरी काळजी पडला आहे.

असे आहेत विहीर खोदकामाचे दर (एका फुटासाठी)

गाळ काढणे २७०० ते ३ हजार रुपये

दगड काम ७ ते ८ हजार रुपये

नवीन विहीर १०० फुटांपर्यंत सहा ते साडेसहा लाख

यंदा कांदा पिकास पाणी पुरेल या आशेने शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली. परंतु ऐनवेळी विहिरीच्या पाण्याची पातळी खालावली त्यामुळे शेतकरी पीक वाचविण्यासाठी परिश्रम घेत आहेत
- तात्या पवार, शेतकरी, बागलाण

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jairam Ramesh: अमेरिका-इराण चर्चेत पाकिस्तान बनला शांतिदूत?; मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाला धक्का, काँग्रेसची जोरदार टीका

Fertilizer Shop License Action: जालन्यात वर्षभरात ६४ कृषी सेवा केंद्रांच्या परवान्यावर कारवाई

Goat Care in summer: उन्हाळ्यात शेळ्यांच्या आहारात काय बदल करावे?

Land Inheritance: वारसाहक्कात अपेक्षित मोठे बदल

Poultry Shed Management: उन्हाळ्यात कोंबड्यांच्या शेडचं व्यवस्थापन; मरतुक टाळण्यासाठी उपाय

SCROLL FOR NEXT