APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Shegaon APMC : शेगाव बाजार समितीची उलाढाल पोहोचली १०० कोटींवर

Latest Agriculture News : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वर्षभरात धान्य खरेदीच्या माध्यमातून १०० कोटींवर आर्थिक उलाढाल झाली आहे.

Team Agrowon

Buldana News : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वर्षभरात धान्य खरेदीच्या माध्यमातून १०० कोटींवर आर्थिक उलाढाल झाली आहे. मार्च अखेर मागील वर्षीच्या तुलनेत सुमारे ३५ लाख रुपयांनी उत्पन्नात वाढ अपेक्षित आहे, अशी माहिती बाजार समिती प्रशासनातर्फे देण्यात आली.

संतनगरी शेगाव येथील बाजार समिती उत्पन्न वाढीसाठी सातत्याने वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करीत आहे. यंदा एक कोटी चाळीस लाख रुपयांचे उत्पन्न बाजार समितीला झाले आहे. गेल्या ४० वर्षांपासून सहकार नेते पांडुरंगदादा पाटील यांच्या मार्गदर्शनात ही बाजार समिती सातत्याने घोडदौड करीत असल्याचेही सांगण्यात आले. बाजार समितीमध्ये धान्य बाजारात सध्या १० अडते, ३० व्यापारी, १०० चे जवळपास हमाल मापारी कार्यरत आहेत.

तर यंदा बाजार समितीअंतर्गत दोन जिनिंगमध्ये कापूस खरेदीही करण्यात आली. केंद्र शासनाच्या नाफेड योजनेअंतर्गत शासकीय हमीभाव, माटरगाव उपबाजार येथे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कॅन्सरग्रस्त शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची आर्थिक मदत बाजार समितीमर्फत दिली जाते.

ओवा खरेदीची सुविधा

पश्‍चिम विदर्भात ‘ओव्या’ची शेती केली जात असून, हा शेतीमाल खरेदीची सुविधा शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच आहे. या बाजार समितीमध्ये बुलडाणा व अकोला जिल्ह्यांतून शेतीमाल मोठ्या प्रमाणात विक्रीला येत असतो. बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्क्रीनद्वारे शेतीमालाचे बाजारभाव दररोज प्रदर्शित करण्यात येतात.

शेगाव बाजार समितीने उत्कृष्ट काम केल्याबद्दल यंदा राज्य शासनाच्या बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प योजनेमध्ये बुलडाणा जिल्ह्यामध्ये प्रथम, अमरावती विभागात चौथे तर राज्यामध्ये ११ वा क्रमांक या बाजार समितीने मिळवला आहे.

गेल्या काही वर्षापासून शेगाव बाजार समितीमध्ये सहकार नेते पांडुरंगदादा पाटील यांच्या अधिपत्याखालील संचालक मंडळ कार्यरत असून ते शेतकरीहित लक्षात घेत काम करीत आहेत. त्यामुळे बाजार समितीचे कार्य सुरू आहे.
- गोपाळराव मिरगे, सभापती, कृऊबास, शेगाव
शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतीमालाल चांगला भाव मिळवून देण्याचा सातत्याने प्रयत्न असतात. तसेच शेतकऱ्यांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचेही काम हातात घेतलेले आहे. नवीन प्रशासकीय कार्यालयीन इमारतीचे काम सुरू आहे. सोबतच पिण्याच्या पाण्याची सुविधा, विद्युत, शेतीमाल तारण योजना, अवैध खरेदीवर अंकुश आणण्यासाठी शेतीमाल तपासणी नाके, गोदाम निर्मिती, शेतकऱ्यांना मोबाइलवर संदेशाद्वारे बाजारभाव सुविधा देत आहोत.
- विलास पुंडकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, शेगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Accident Scheme: तीस दिवसांच्या अटीऐवजी १२० दिवसांच्या मुदतीचा प्रस्ताव

Godavari Flood Management : गोदावरी पूरप्रश्नी कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर

Green Monsoon Drive : ‘ग्रीन मॉन्सून’ अंतर्गत दऱ्याई माता परिसरात ५ हजार देशी वृक्षांचे रोपण

Jalyukt Shivar Abhiyan: जलयुक्त शिवार योजनेची ६२२ कामे अंतिम टप्प्यात

District Central Bank : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने दिली ४५८१ सभासदांची यादी

SCROLL FOR NEXT