Mumbai APMC q
Mumbai APMC qAgrowon

Mumbai APMC Scam : ‘एफएसआय’ घोटाळ्या प्रकरणी फौजदारीचे आदेश

Mumbai APMC FSI Scam : या आदेशामुळे बाजार समिती संचालकांचे धाबे दणाणले आहेत. २० जून २०१४ रोजी ‘ॲग्रोवन’ने ‘बाजार समितीतला बाजार’ या मथळ्याखालील वृत्तमालिकेद्वारे गैरव्यवहार बाहेर काढला होता.

Pune News : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील चटईक्षेत्र (एफएसआय) प्रकरणी बाजार समिती व गाळाधारकांत झालेल्या ‘लिज डीड’मधील खंड २५ प्रमाणे फरकाची रक्कम वसुल करावी, दोषींवर फौजदारी कारवाई करावी, असे आदेश सहकार व पणन विभागाने पणन संचालक व मुंबई बाजार समितीच्या सचिवांना दिले आहेत.

या आदेशामुळे बाजार समिती संचालकांचे धाबे दणाणले आहेत. २० जून २०१४ रोजी ‘ॲग्रोवन’ने ‘बाजार समितीतला बाजार’ या मथळ्याखालील वृत्तमालिकेद्वारे गैरव्यवहार बाहेर काढला होता. यानंतर तत्कालीन पणन संचालक डॉ. सुभाष माने यांनी बाजार समिती संचालक मंडळ बरखास्त करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश तत्कालीन जिल्हा उपनिबंधक दिलीप उढाण यांना दिले होते.

यानंतर न्यायालयाने हे प्रकरण नामंजूर केल्याने कारवाईचे आदेश दिल्याचे पणन विभागाचे कक्ष अधिकारी शैलेश सुर्वे यांनी पत्रात म्हटले आहे. सुर्वे यांनी संबधितांवर वसुली आणि फौजदारी कारवाईचे आदेश पणन संचालकांना दिले आहेत.

Mumbai APMC q
Mumbai APMC News : मुंबई बाजार समिती बरखास्तीच्या मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नाला सुरुंग

मुंबई बाजार समितीमधील पाच हजार चौरस मीटरचा ‘एफएसआय’ केवळ ६०० रुपये दराने विकून बाजार समितीचे १२६ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका लेखापरिक्षण अहवालात ठेवला आहे. या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, ‘एफएसआय’मधील फरकाची रक्कम वसूल करावी, यासाठी बाजार समितीच्या एका संचालकाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

त्यावर इतर संचालकांनी हरकत याचिका दाखल केली. या न्यायालयीन प्रकरणात १३ मार्च २०२४ रोजी न्यायालयाने वादी व प्रतिवादींचे युक्तिवाद एकूण घेऊन १९ मार्च २०२४ रोजी आदेश दिला आहे. न्यायालयाच्या निकालानुसार श्री. सुर्वे यांनी कारवाईचे आदेश दिले.

सुर्वे यांनी पत्रात म्हटले आहे की, मुंबई बाजार समिती व गाळेधारक यांच्यात झालेल्या ‘लिज डीड’मधील खंड २५ प्रमाणे फरकाची रक्कम वसुल करावी. वसुलीस नकार देणाऱ्या गाळाधारकांचे गाळे वाटपाचे आदेश रद्द करून वसुलीबाबत जिल्हा न्यायालय, ठाणे येथे याचिका दाखल करावी. दोषी व्यक्तींविरुद्ध फौजदारी कारवाई करावी.

Mumbai APMC q
Mumbai APMC : मुंबई बाजार समिती आंतरराष्ट्रीय घोषित करा

आमदार शिंदेंनी उठवला आवाज

या प्रकरणी कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी विधानसभा अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडत ‘एफएसआय’ वाटपात बाजार समितीचे अधिकारी व संचालक मंडळ दोषी असल्याचा प्रश्न उपस्थित केला होता.

त्यावर उत्तर देताना पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी मुंबई बाजार समितीमध्ये ४६६ गाळेधारकांना ‘एफएसआय’चे वाटप केलेले आहे. या गाळेधारकांकडून फरकाची रक्कम वसूल करण्याची कारवाई करण्याची ग्वाही दिली होती. तसेच याप्रकरणी न्यायालयात शपथपत्र दाखल करून न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असेही आश्वासन दिले होते.

सत्यमेव जयते ः डॉ. माने

‘एफएसआय’प्रकरणी धडक कारवाई करणारे तत्कालीन पणन संचालक डॉ. सुभाष माने यांनी ‘सत्यमेव जयते’ अशी प्रतिक्रिया ‘ॲग्रोवन’शी बोलताना दिली. ‘सत्य परेशान होता है....लेकीन पराभूत नही,’ असेही ते म्हणाले. या प्रकरणात मला प्रचंड त्रास देण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com