Jitendra Singh Kongharrekar Agrowon
ॲग्रो विशेष

Success Story: अडचणीतील सेवा सोसायटीचा साधला उत्कर्ष

Pandharkawda Service Society: कधीकाळी अडचणीत सापडलेली पांढरकवडा सेवा सोसायटी आज विविध उपक्रमांनी शेतकऱ्यांचा आधार बनली आहे. अध्यक्ष जितेंद्रसिंग कोंघारेकर यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने पुनरुज्जीवनाचा प्रेरणादायी प्रवास केला आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Yavatmal News: पांढरकवडा सहकारी खरेदी-विक्री समिती कधीकाळी तालुक्‍याचे वैभव जपणारी संस्था होती. त्यापुढील काळात तत्कालीन संचालकांच्या कार्यपद्धतीमुळे ही संस्था आर्थिक दिवाळखोरीत निघाली. मात्र विद्यमान अध्यक्षांसह संचालकांनी या संस्थेला उत्पन्नक्षम उपक्रमाद्वारे पुनरुज्जीवित करण्यावर भर दिला आहे.

पांढरकवडा सेवा सोसायटीची स्थापना १९५९ रोजी स्थापना करण्यात आली. या संस्थेची सभासद संख्या आज ४२०० वर पोहोचली आहे. २०१५ मध्ये जितेंद्रसिंग कोंघारेकर यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी आली.

त्या वेळी संस्थेचा एकही उपक्रम सुरू नव्हता. त्याबरोबरच न्यायालयीन प्रकरणे देखील होती. संस्थेला कर्जाच्या गर्तेतून बाहेर कसे काढता येईल, यावर सुरुवातीला मंथन झाले. त्याकरिता व्यावसायिकता जपण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्या करिता संस्थेची आर्थिक स्थिती योग्य नसल्याने ५० लाख रुपयांची सीसी (कॅश क्रेडिट मर्यादा उभारण्यात आली. यापूर्वीचे परवाने नूतनीकरणाअभावी रद्द झाले होते.

त्यामुळे बी-बियाणे, रासायनिक खते याचे परवाने पुन्हा मिळविण्यात आले. महाबीज, एमएआयडीसी, विदर्भ मार्केटिंग कॉपोर्रेशन यांची मदत या कामी झाली. त्यांच्याकडून बियाणे व खताची खरेदी करण्यात आली. यातून आज निविष्ठांची उलाढाल दोन कोटी रुपयांवर पोहोचली आहे. सोयाबीन, तूर त्याबरोबरच रब्बी हंगामात हरभरा बियाणे विक्री अनुदानावर करण्यात आली, त्यातूनही उत्पन्न वाढले.

२०१५ पर्यंत हमीभावाने शेतीमालाची खरेदीदेखील बंद होती. आता महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन यांच्या माध्यमातून हमीभावाने खरेदीवर भर देण्यात आला. यामध्ये संस्थेला एक टक्‍का कमिशन दिले जाते. त्यातून फारसे उत्पन्न होत नसले तरी शेतकऱ्यांशी कनेक्‍ट राहतो. संस्थेकडे असलेल्या एका गोदामात खताची साठवणूक होते.

त्यामुळेच ज्वारी खरेदीकरिता बाजार समितीचे गोदाम भाडेतत्त्वावर घेण्यात आले. येत्या काळात व्यापारी संकुल आणि गोदामाची उभारणी होईल. याचा वापर करून धान्य तारण योजना राबविली जाणार आहे. २०१६-१७ मध्ये अटल पणन योजना राबविण्यात आली. यात चांगले काम केल्यामुळे संस्थेला अमरावती विभागातून तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते दुसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

ड्रोनने फवारणी

संस्थेला ‘इफ्को’कडून (इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑप.लि.) १ लाख रुपये अनामत घेऊन ड्रोनचा पुरवठा करण्यात आला आहे. पाच वर्षांत २० हजार एकरांवर ड्रोनद्वारे फवारणीचा उद्देश साधल्यास अनामत रक्‍कम देखील परत केली जाणार आहे. त्याबरोबरच इतर कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. त्यामुळे संस्थेला हा ड्रोन निःशुल्क उपलब्ध होणार आहे. फवारणी पंप नादुरुस्त झाले तर नवेच घ्यावे लागते. शेतकऱ्यांचा यावर अधिक खर्च होतो. ही बाब लक्षात घेता संस्थेने फवारणी पंप दुरुस्ती निःशुल्क शिबिर घेतले.

शेतकऱ्याच्या हस्ते ध्वजवंदन

आत्महत्याग्रस्त अशी यवतमाळची ओळख. मात्र अशाही स्थितीत अनेक शेतकऱ्यांनी शेतीत प्रयोगशीलता जपत आर्थिक सक्षमता गाठली आहे. अशा शेतकऱ्यांपासून इतरांना प्रेरणा मिळावी या करिता त्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यावर भर देण्यात आला आहे. महाराष्ट्र दिन, प्रजासत्ताक दिन तसेच स्वातंत्र्य दिनाला हा मान दिला जातो.

जितेंद्रसिंग कोंघारेकर : ९४२२१२२१५५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

SCROLL FOR NEXT