Shubhanshu Shukla Agrowon
ॲग्रो विशेष

Axiom-4 Mission: अंतराळात पुन्हा तिरंगा

Shubhanshu Shukla: १९८४ नंतर तब्बल ४१ वर्षांनी भारताच्या शुभांशू शुक्ला यांनी पुन्हा एकदा अंतराळात भारताचा तिरंगा फडकावला. ‘ॲक्झिओम-४’ मोहिमेद्वारे त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर झेप घेत ऐतिहासिक कामगिरी केली असून, हे भारताच्या मानवी अंतराळ मोहिमेचे नवीन पर्व मानले जात आहे.

Team Agrowon

New Delhi News: ‘नीले गगन के तले धरती का प्यार पले’ या गाण्यातील वर्णन केलेल्या धरतीचे म्हणजेच पृथ्वीचे मनोहारी दर्शन निळ्याशार आकाशातून भारताचे दुसरे अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी घेतले. ‘ॲक्झिओम स्पेस’ या खासगी अवकाश संस्थेच्या ‘ॲक्झिओम-४’ या व्यावसायिक मोहिमेद्वारा शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (आयएसएस) बुधवारी (ता. २५) दुपारी १२ वाजून एक मिनिटांनी आकाशात झेप घेऊन इतिहास घडविला.

भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा हे तत्कालीन सोव्हिएत महासंघाच्या मोहिमेद्वारे १९८४ मध्ये अंतराळात गेले होते. तेथे ते आठ दिवस होते. त्यानंतर ४१ वर्षांनी शुक्ला हे अंतराळात जाणारे दुसरे भारतीय तर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर आहेत.

‘‘आपण पुन्हा ४१ वर्षांनी अंतराळात भरारी घेतली आहे. आम्ही ७.५ किलोमीटर प्रतिसेकंद वेगाने पृथ्वीची परिक्रमा करीत आहोत. ही एक अभूतपूर्व सफर आहे. माझ्या खांद्यावरील तिरंगा मला सांगत आहे, की मी तुमच्याबरोबर आहे. माझा हा प्रवास अंतराळ स्थानकाची (आयएसएस) सुरुवात नाही तर भारताच्या मानवी अंतराळ कार्यक्रमाचा प्रारंभ आहे.

तुम्हीही या मोहिमेचा हिस्सा बनावा, अशी माझी अपेक्षा आहे. तुमचा उर अभिमानाने फुलून यायला हवा. आपण सर्वजण एकत्र येऊन भारताच्या मानवी अंतराळ मोहिमेचा प्रारंभ करू या. जयहिंद! जय भारत,’’ असा संदेश शुक्ला यांनी उड्डाणानंतर अवकाशातून पाठविला.

उड्डाणापूर्वी शुक्ला म्हणाले की ‘‘या मोहिमेमुळे माझ्या देशातील पिढीची उत्सुकता जागृत होऊन नवोन्मेषाला चालना मिळण्याची आशा आहे. मी एकटा अंतराळ मोहिमेवर आलो तरी हा १.४ अब्ज भारतीयांचा प्रवास आहे,’’ असा मला विश्वास आहे. शुक्ला यांच्यासह चार अंतराळवीरांची ही मोहीम विविध कारणांनी सहा वेळा पुढे ढकलण्यात आली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Mapping: गावाचे मॅपिंग नसल्याने शेतकऱ्यांची वाढली चिंता

Nanded Unseasonal Rain: नांदेडला अवकाळीचा केवळ हदगावला फटका

Reservoir Levels Drop: पाणीसाठ्यामध्ये तीन टक्क्यांची घट

Sangli Water Crisis: सांगलीत सिंचन योजनांसह पिण्याच्या पाण्यात कपात

Baloon Dam Issue: वाळूसाठी गिरणेवरील बलून बंधारे दुर्लक्षित

SCROLL FOR NEXT