Manikrao Kokate Agrowon
ॲग्रो विशेष

Manikrao Kokate: वेळ आली, की कर्जमाफीचा विचार : कृषिमंत्री कोकाटे

Farmer Protest: राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत अनेक विषय चर्चेत आहेत. या सर्व बाबींचा विचार करून वेळ आली, की कर्जमाफीसंदर्भात विचार केला जाईल.

Team Agrowon

Satara News: राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत अनेक विषय चर्चेत आहेत. या सर्व बाबींचा विचार करून वेळ आली, की कर्जमाफीसंदर्भात विचार केला जाईल. बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी गुरुवारी केले.

येथील वेण्णालेकनजीक महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्राच्या नव्याने उभारण्यात येत असलेल्या इमारत अतिथिगृह भूमिपूजनप्रसंगी ते माध्यमांशी बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणेचे उपाध्यक्ष तुषार पवार, विद्यापीठ अभियंता डॉ. मिलिंद ढोके गहू गेरवा कवक शास्त्रज्ञ डॉ. दर्शन कदम, गहू रोग शास्त्रज्ञ डॉ. मनीष सुशीर, वनस्पतीरोग शास्त्रज्ञ डॉ. विक्रांत साळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री

फरांदे यांच्यासह गहू गेरवा संशोधन केंद्रातील कर्मचारी, कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील अधिकारी कर्मचाऱ्यांसह मान्यवर उपस्थित होते. मंत्री कोकाटे म्हणाले, ‘‘शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी आंदोलन करण्यापूर्वी बच्चू कडू यांच्यासमवेत बैठक झाली होती.

वेळ आल्यावर हा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत घेत या संदर्भात विचारविनिमय करून योग्य निर्णय घेतला जाईल. त्यांच्या मागणीसंदर्भात मी पुन्हा एकदा सरकारसोबत चर्चा करतो. मागील पंधरा दिवसांत माण, खटाव व फलटण तालुक्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, लवकरच भरपाईबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT