Bacchu Kadu Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Protest: चक्‍का जाम आंदोलनातून शेतकऱ्यांची ताकद दिसेल

Bacchu Kadu: अन्नत्याग आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने कर्जमाफी विषयक समितीची स्थापना केली. परंतु समितीच्या रचनेबाबत कोणतीच स्पष्टता नाही. परिणामी गुरुवारी (ता. २४) राज्यभरात नियोजित चक्‍का जाम आंदोलन मोठ्या जोमाने होईल.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amravati News: अन्नत्याग आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने कर्जमाफी विषयक समितीची स्थापना केली. परंतु समितीच्या रचनेबाबत कोणतीच स्पष्टता नाही. परिणामी गुरुवारी (ता. २४) राज्यभरात नियोजित चक्‍का जाम आंदोलन मोठ्या जोमाने होईल, अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिली.

शेतीकामाचा समावेश रोजगार हमी योजनेत व्हावा, दिव्यांगाचे मानधन सहा हजार रुपये करण्यात यावे, यासह शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी या व इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी श्री. कडू यांनी मोझरी येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन केले होते.

त्यानंतर श्री. कडू यांनी सातबारा कोरा ही पदयात्रा काढली. या आंदोलनाची दखल घेत पावसाळी अधिवेशनात सरकारकडून कर्जमाफी विषयक समितीची स्थापना करण्यात आली. परंतु समिती अध्यक्षापासून ते यातील सदस्य व कालावधी या साऱ्या बाबी गूढ ठेवण्यात आल्या आहेत.

समितीच्या कामकाज कालावधीबाबतही स्पष्टता नाही. त्यामुळे हा प्रकार शेतकऱ्यांचा रोष शमविण्यासाठी शासनाने हेतुपुरस्सर केल्याचा आरोप श्री. कडू यांनी केला. बड्या उद्योजकांचे कर्ज ‘राइटऑफ’ करणाऱ्या शासनाकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मात्र पैसा नाही.

त्यामुळेच आता शासनाला खरी ताकद दाखविण्याची वेळ आली आहे. त्याकरिता गुरुवारी (ता. २४) होणाऱ्या कर्जमाफी संदर्भातील चक्‍का जाम आंदोलनात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Protest: शेतकरी कर्जमाफी, ओला दुष्काळ जाहीर करा

Crop Insurance Compensation: तातडीने विमा भरपाईसाठी कंपन्यांना निर्देश देऊ

APMC Pune: शेतीमाल प्रक्रिया मूल्यवर्धन प्रकल्प उभारणार

Heavy Rainfall: नैसर्गिक आपत्तीतून वाचलेल्या कपाशीची वाताहत

Cooperative Bank Award: उत्कृष्ट सहकारी संस्थांना सन्मानाची ढाल प्रदान

SCROLL FOR NEXT