Save the Truffle : इटलीतील वायव्येकडील अल्बा प्रदेशातील लांघे या ग्रामीण भागातील ट्रेइसो टेकड्यांचा प्रदेश धुक्याने भरून गेला आहे. या टेकड्यांमध्ये एक अनोखा व्यवसाय चालतो - ट्रफल हंटिंगचा. ट्रफलचे शास्त्रीय नाव Tuber magnatum Pico हे आहे. ही जमिनीखाली वाढणाऱ्या Tuberaceae या कुळातील बुरशीचे खाण्यायोग्य असे बीजाणू असतात. जमिनीमध्ये खोलवर असलेल्या ट्रफलचा शोध घेण्याची (ट्रफल हंटिंगची) शेकडो वर्षे जुनी प्रथा असून, त्यात प्रशिक्षित कुत्र्यांची मदत घेतली जाते.
कार्लो मरेंडा (वय ४२) यांना ट्रफल हंटिंगबद्दल वयाच्या पाचव्या वर्षी एका मित्राकडून समजले. तेव्हापासून ते हा व्यवसाय करत आहेत. या व्यवसायातील गुप्त बाबी आणि अनुभव केवळ आपल्या पुढील पिढ्यांना दिला जातो. मात्र गियूसेप्पे गियामेसिया (टोपणनाव नोटू) हा त्याचा मित्र आपल्या कुत्र्यांसह एकटाच राहत असल्याने २०१४ मध्ये मरण्याआधी त्यांनी आपली सारी रहस्ये आपल्या कुत्र्यांसह कार्लोकडे दिली.
या वारशासोबतच त्यांनी दिलेला संदेश फार महत्त्वाचा होता. ‘‘आपल्याला जर ट्रफल नष्ट होण्यापासून वाचवायचे असेल, तर आपल्याला जंगले वाचवली पाहिजेत. जंगलातील झरे, निर्झर हे प्रदूषित होण्यापासून वाचवले पाहिजेत आणि ट्रफल झाडांची नवी लागवड सतत करत राहावी लागेल.’’
हाच उद्देश ठेवत मरेंडा यांनी निसर्गशास्त्राचे संशोधक एडमोंडो बोनेल्ली यांच्यासह २०१५ मध्ये ‘ट्रफल वाचवा’ (सेव्ह द ट्रफल) ही संस्था सुरू केली. ‘ट्रफल वाचवा’ या आपल्या संस्थेमार्फत बोरोलो येथील संरक्षित केलेल्या जंगलामध्ये कार्लो मरेंडा आपल्या बक या कुत्र्यासोबत पांढऱ्या ट्रफलचा शोध घेत आहेत.
ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात अल्बा येथे ट्रफल प्रदर्शन भरवले जाते. या प्रदर्शनामध्ये विक्रीस ठेवलेले पांढरे ट्रफल. पांढरे ट्रफल हे काळ्या ट्रफलपेक्षा पाच पटीने महाग असतात. कारण त्यांना असलेला ओक, नट्स आणि गोडसर मातीचा असलेला एक वैशिष्ट्यपूर्ण गंध. याची किंमत ४ हजार पौंड प्रति अर्धा किलो (भारतीय रुपयांमध्ये ४.२८ लाख रुपये प्रति अर्धा किलो) असते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.