
Vasai News : दिवाळी सण नागरिकांनी जोरदार उत्साहात आनंदात साजरा केला, तरी शहरात फटाक्यांची आतषबाजी आणि हवेतील धूलिकणांचा प्रादुर्भाव अधिक वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम झाला आहे. हवेचा गुणवत्ता निर्देशांक वाढल्याचे दिसून येत आहे. पालघर जिल्ह्यात बोळिंज, विरार येथे सर्वाधिक हवेची गुणवत्ता खालावली असून निर्देशांक १७८ वर पोहोचला आहे.
हवेची गुणवत्ता निर्देशांकानुसार ठरत असतो. स्वच्छ हवा असेल, तर शून्य ते ५० दरम्यान निर्दशांक असतो. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य उत्तम राहते. ५१ ते १०० दरम्यान निर्देशांक असेल, तेव्हा समाधानकारक, तर १०१ ते २०० आणि २०१ ते ३०० यामध्ये निर्देशांक असल्यास अनुक्रमे मध्यम आणि वाईट गुणवत्ता असल्याचे समजले जाते. निर्देशांक जास्त असल्यास हवा नागरिकांच्या आरोग्याला मोठ्या प्रमाणात बाधक ठरत असते.
सद्य:स्थितीत विरार, वसई, नवघर, बोईसर या भागात प्रदूषण मंडळाकडून हवेच्या गुणवत्तेची नोंद करण्यात आली, मात्र आठवड्याभरापूर्वी समाधानकारक होती. त्यावेळी हवा स्वच्छ असल्याचे दिसून आले. स्वच्छ हवेसाठी ५० गुणवत्ता निर्देशांक असला पाहिजे, मात्र आनंदाने, फटाक्याच्या आतषबाजीने दिवाळी साजरी करण्यात आली. या सणाच्या दरम्यान हवा प्रदूषण झाले असल्याचे समोर येत आहे. विरार येथे १७४ एक्यूआय हवा गुणवत्ता निर्देशांक असून त्या खालोखाल वसई, बोईसर येथील निर्देशांक वाढला आहे.
कचराही वाढला
वसई-विरार शहरात दिवाळीनिमित्त साफसफाई करण्यात आली. तसेच फटाके व अन्य कचरादेखील मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग निर्माण होत आहेत.
महामार्गावर धूलिकणांचा प्रादुर्भाव
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे अनेक रस्ते खोदले आहेत. त्यामुळे मातीचे ढिगारे दिसून येतात. वाहनांची वर्दळ अधिक असल्याने माती हवेत मिसळून धूलिकणांचा प्रादुर्भाव नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे या कामाला तत्काळ गती मिळून लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी चालकांकडून होत आहे. हवेत प्रदूषणाचे प्रमाण वाढले असल्याने खोकला, सर्दी, डोकेदुखी, डोळे चुरचुरणे, श्वसनास त्रासाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.