Manoj Jarange-Patil Agrowon
ॲग्रो विशेष

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला अखेर यश; सरकारच्या अध्यादेशानंतर आंदोलन मागे

Maratha Andolan : मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे कूच करणाऱ्या मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या राज्य शासनाने मान्य केल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणाऱ्या मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना आखेर यश आले आहे. त्यांच्या सर्व मागण्या राज्य शासनाने मान्य केल्या आहेत. तसेच याबाबत अध्यायदेश शनिवारी (दि २७ रोजी) काढला. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी येथून मुंबई असा मोर्चा काढला होता. तर त्यांचा ताफा वाशीतच थांबण्यात आला होता. तेथेच राज्य सरकारच्या शिष्टमंडळाकडून तोडग्यावर चर्चा करण्यात येत होती. त्या चर्चेस यश आले आहे. यामुळे मराठा समाजाला कुणबी नोंदणी प्रमाणपत्र देण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

मराठा आरक्षणासाठी २०११ पासून लढा सुरू होता. त्यास २०१४ मध्ये यश आले आहे. यावर मनोज जरांगे यांनी, १४ वर्षांचा वनवास संपला आहे. राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढण्यात आला आहे. ज्यात मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचे म्हटलं आहे. तसेच या निर्णयानंतर वाशीत जमा झालेल्या मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.

यावेळी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा देताना, कोणाला जातप्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत असतील, तर मी लढत राहणार आहे. माझं आंदोलन यापुढे सुरु राहणार असल्याचे म्हटलं आहे.

वाशीत विजयी सभा

मराठा आरक्षणासाठी तब्बत १४ वर्षांची वाट पाहायला लागल्यानंतर आज तो क्षण सत्यात उतरला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे. यामुळे राज्यभर उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान राज्य सरकारने यावर अध्यायदेश काढल्याने आज शनिवारी (दि २७ रोजी) छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी-नवी मुंबई येथे विजयी सभा होणार झाली. यासभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, दिपक केसरकर उपस्थित होते. यावेळी शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं. तर शिंदे यांनी मनोज जरांगे यांना विजयी गुलाल लावला.

सर्व श्रेय समाजाचे

मराठा आरक्षणासाठी समाजाने खूप संघर्ष केला. त्यासाठी मी संघर्ष केला. शेवटी आम्हाला मुंबईकडे यावं लागलं. यानंतरच मराठ्यांच्या ताकदीमुळे हा अध्यादेश निघाला. यामुळे याचे सर्व श्रेय समाजाचे आहे.

५४ लाख नोंदी

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी राण उढवल्यानंतर राज्य सरकारकडून कुणबी शोध मोहीम हाती घेण्यात आली. या मोहीमेतून मराठ्यांच्या ५४ लाख नोंदी सापडल्या. तर मनोज जरांगे हे मुंबईकडे निघाल्यानंतर कुणबी प्रमाणपत्र वाटपाचे गावोगावी शिबीरे आयोजित केली जात आहेत.

मनोज जरांगे यांच्या मागण्या

नोंद सापडणाऱ्यांच्या सोयऱ्यांनाही सरसकट प्रमाणपत्र द्या

शपथपत्र घेऊनच सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या

कोर्टात आरक्षण मिळेपर्यंत मुला-मुलींना १०० टक्के शिक्षण मोफत करा

जिल्हास्तरावर वसतिगृह बांधा

मनोज जरांगे यांच्या मागण्या

आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करु नका, केल्यास मराठा आरक्षणाच्या जागा राखीव ठेवा

आंतरवालीसह राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे घ्या

SEBC अंतर्गत 2014 च्या नियुक्त्या त्वरित द्या

वर्ग 1 व 2 आणि पोलीस उपनिरीक्षक पदाच्या नियुक्त्या द्या

रात्रीपर्यंत शासननिर्णयाचे अध्यादेश द्या, आझाद मैदानात जात नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT