Chandrashekhar Bhadsawale Agrowon
ॲग्रो विशेष

Chandrashekhar Bhadsawale : जगभर पोहोचले ‘एसआरटी’ तंत्र

Team Agrowon

चंद्रशेखर भडसावळे

आम्हाला सगुणा रिजनरेटिव्ह तंत्रज्ञान (एसआरटी) या शेती पद्धतीला संशोधित करून बारा वर्षे झाली. महाराष्ट्रातील २६ जिल्हे आणि गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, कर्नाटक, तेलंगणा व आंध्र प्रदेश तसेच थायलंड, व्हिएतनाम, बांगलादेशामध्ये या तंत्रज्ञानाचा प्रसार झाला आहे. महाराष्ट्रामध्ये सगुणा रिजनरेटिव्ह तंत्रज्ञानाच्या प्रसारामध्ये दैनिक ‘ॲग्रोवन’चा महत्त्वाचा सहभाग आहे. सामान्य शेतकऱ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत आणि अचूक छायाचित्रांचा वापर करून तंत्रज्ञानाची माहितीची मांडणी शेतकऱ्यांच्या समोर येते.

सगुणा रिजनरेटिव्ह तंत्रज्ञानाबाबत विविध लेख, वेगवेगळ्या पिकांतील शेतकऱ्यांच्या यशोगाथा वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्याने तंत्रज्ञान सर्वदूर पोहोचले. २०२० मधील ॲग्रोवन दिवाळी अंकामध्ये सगुणा रिजनरेटिव्ह तंत्रज्ञानाची यशोगाथा वाचून राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी मला शेतीची नवी दिशा सापडली असे फोन करून सांगितले. सर्वसामान्य शेतकऱ्यांना तांत्रिक माहिती घरबसल्या मिळाल्यामुळे या तंत्राचे छोट्या क्षेत्रावर प्रयोग करणे सोयीचे झाले. या तंत्रामुळे लागवडीचा खर्च, शेतातील ढोर मेहनत कमी झाली. जमिनीची सुपीकता सुधारली, पिकांची उत्पादकता वाढली. आर्थिक नफ्यात वाढ झाली, असे आश्‍वासक बदल झाल्याचे शेतकरी सांगतात.

अडचणीतून तंत्रज्ञानाचा विकास

एसआरटी हे शून्य मशागत तंत्र एक प्रकारच्या अपघातानेच जन्माला आले. पारंपरिक भात शेती करताना खूप त्रास व्हायचा. पावसावर अवलंबून राहावे लागायचे, कारण चिखलणी करण्यासाठी पुरेसे पाणी लागायचे. पाऊस पडला, की ट्रॅक्टरवाला वेळेत आला पाहिजे, नांगर व्यवस्थित चालले पाहिजेत. एवढे केल्यावर सुद्धा भात रोपे लावणीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये माणसं उपलब्ध व्हायला पाहिजेत. या तीनही गोष्टींवर शेतकऱ्यांना अवलंबून राहावे लागते. या कारणामुळे मी स्वतः बेजार झालो होतो. मी सतत शोधत होतो, की लावणी न करता आपल्याला भात शेती कशी करता येईल?

याच प्रश्‍नावर उत्तरे शोधताना साधारणपणे २०११ मध्ये एसआरटी तंत्राची कार्यप्रणाली निश्‍चित केली. २०१२ मध्ये सगुणा बागेतील १५ एकर क्षेत्रावर कायमस्वरूपी गादीवाफ्यावर टोकण पद्धतीने भात बियाणे लागवड केली. त्या वर्षी सर्व शेतांमध्ये भाताचे अतिशय भरघोस पीक आले. मलाच विश्‍वास बसत नव्हता, की एवढ्या कमी खर्चात, कमी श्रमात माझे सर्व शेत भात लागवडीखाली पहिल्यांदा आले होते. हा आत्मविश्‍वास बाळगून मी आणि माझा आदिवासी सहकारी कर्जत तालुक्यातील गावागावांत जाऊन रोज याविषयी प्रेझेन्टशनद्वारे माहिती सांगू लागलो. जागतिक बँकेने यासाठी मला लॅपटॉप आणि प्रोजेक्टर भेट दिला होता.

नवीन आधुनिक प्रयोग करण्यास शेतकरी सुरुवातीला तयार होत नव्हते. म्हणून मी त्यांना नुकसान भरपाईची हमी दिली आणि २०१३ मध्ये कर्जत तालुक्यातील ३० शेतकऱ्यांच्या शेतावर एसआरटीचे प्रयोग घेतले. गादीवाफ्यावर कधी भातशेती असते का? हे यशस्वी होईल का? आमच्या वाडवडिलांनी चिखलणीशिवाय कधी भातशेती केली नाही? असे नानाविविध प्रश्‍न शेतकरी विचारत होते. या ३० शेतकऱ्यांपैकी २० शेतकरी अतिशय यशस्वी झाले. त्यांचे भात पीक भरघोस पिकले. कधी एवढे पीक पाहिले नव्हते ते एसआरटीने पहिल्यांदा आले होते. ३० पैकी १० शेतकऱ्यांच्या शेतावर खेकड्याने रोपे खाल्ली, तण जास्त झाले, दुर्लक्ष झाले, अशा कारणांमुळे अपयश आले. याचा मी व माझ्या टीमने पुढे बारकाईने अभ्यास सुरू केला. त्यावरही पर्याय शोधून काढले.

(सविस्तर वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Palm Oil Prices : जागतिक बाजारात पामतेलाचे भाव वाढलेले; मलेशियाला होतोय फायदा

Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

Soybean Subsidy : सोयाबीन अनुदानासाठी आधार संमती पत्र भरून द्या; कृषी सहाय्यकांचं शेतकऱ्यांना आवाहन

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

Groundnut Harvesting : बोरपाडळे परिसरात भुईमूग काढणी सुरू

SCROLL FOR NEXT