Ashadhi Wari Agrowon
ॲग्रो विशेष

Ashadhi Wari 2025: खुडूस फाटा येथे गोल रिंगणावेळी माऊली-माऊली नामजपाचा गजर

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण बुधवारी (ता. २) खुडूस फाटा येथे टाळ-मृदंगाच्या गजरात, माऊली-माऊली नामजपात व अश्वाच्या वेगवान फेऱ्यांनी भक्तिमय वातावरणात पार पडले.

सुदर्शन सुतार

Solapur News: माऊली-माऊलीच्या जयघोषत...सकाळी हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण खुडूस फाटा येथे अपार उत्साहात पार पडले.

नातेपुते येथील मुक्कामानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सकाळच्या थंड हवामानात खुडूस फाटा येथे आल्यानंतर सव्वाआठच्या सुमारास हे रिंगण पार पडले. या ठिकाणी हा सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते. त्या आधी जरीपटक्याचा निशाना असलेल्या अश्वांनी रिंगणस्थळी प्रवेश केला.

सुरुवातीला पालखी रिंगण सोहळ्याभोवती फिरवून आणून मध्यभागी असलेल्या चबुतऱ्यावर विराजमान करण्यात आली. त्या पाठोपाठ डोईवर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकरी, विणेकरी आणि दिंड्या आल्या.

रिंगणात वैष्णवांचा सोहळा पोहोचताच, लाखोंच्या जनसमुदायाने टाळ्याच्या गजरात स्वागत केले. त्यानंतर चोपदारांनी रिंगण लावून घेतले. मानाच्या दिंड्यांना आत सोडले. त्यानंतर माऊलींच्या अश्वाने दौडण्यास सुरुवात करताच भाविकांनी ‘माऊली, माऊली, माऊली’चा गजर केला आणि दोनच मिनिटांत तीन फेऱ्या पूर्ण करून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

रिंगण पूर्ण होताच अश्वाच्या टाचेखालील माती कपाळावर लावण्यासाठी एकच झुंबड उडाली. त्यानंतर रिंगणाचे अश्व विसावताच वारकरी मैदानात उतरले. दिंड्या-दिंड्यांमध्ये खेळ रंगले. हुतुतू, गड्यास गडी, हमामा, सुरपाट, कबड्डी, खो-खो, फुगडी अशा खेळांनी वारकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. निमगावपाटी येथे दुपारी विसावा घेऊन पालखी सोहळा वेळापूरनगरीमध्ये विसावला.\

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT