Soyabean Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Rate : मुंबईसह सोलापुरात शेतकरी आक्रमक; मुंबईत मंत्रालयाबाहेर सोयाबीन फेकून शरद पवार गटाकडून सरकारचा निषेध

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीनला ६ हजार रूपये हमीभाव मिळावा, अशी मागणी लागवून धरली आहे. याच मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले असून मंगळवारी (ता.१) मुंबईसह सोलापुरात शेतकऱ्यांनी आदोलन केले. मुंबईत शरद पवार गटाच्या नेतृत्वात सोयाबीनच्या दरावरून तर सोलापुरात काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून आंदोलन करण्यात आले.

सोयाबीनला ६ हजार रूपये हमीभाव मिळावा या मागणीसाठी मध्य प्रदेश, हरियाणा आणि महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलन करत आहेत. मध्य प्रदेश सरकारने केंद्र सरकारकडे केलेल्या विनंती नंतर यंदाच्या हमीभावात २९२ रुपयांची वाढ करण्यात आली. येथे याआधी सोयाबीनची खरेदी ४ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल दराने होत होती. जी आता ४८९२ रूपये प्रति क्विंटल हमीभावाने केली जाणार आहे. मात्र हरियाणासह मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सोयाबीनला ६ हजार रूपये हमीभाव मिळावा अशी मागणी केली आहे.

याच मागणीसाठी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गटाच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी मुंबईत मंत्रालयाबाहेर आंदोलन केले. यावेळी संतापलेल्या शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत सोयाबीन मंत्रालयाबाहेर फेकले. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी पोलिसांनी काही आंदोलक शेतकऱ्यांना ताब्यात घेतले.

सोयाबीन पिकाला ६ हजारांचा हमीभाव मिळावा, या मागणीसाठी अनेकदा सरकारला निवेदन देण्यात आली. पण यावर कोणताच तोडगा काढण्यात आला नाही. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी मंत्रालयासमोर आज आंदोलन केले. तसेच शेतकऱ्यांचा अंत सरकारने बघू नये, सोयाबीनला ६ हजारप्रमाणे हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

दरम्यान सोलापुरात देखील काँग्रेसने सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत संग्राम मोर्चा काढला. यावेळी शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या विविध मागण्यासाठी हुतात्मा चौक ते जुने जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत संग्राम मोर्चा काढण्यात आला. मोर्चातून शेतीमालला हमीभाव, सरसकट कर्जमाफी, २४ तास पुरवठा, वाढीव पाणीपट्टी कमी करण्यासह मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मांडण्यात आला. या मोर्चात महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते, शेतकरी मोर्चात सहभागी होते.

एकीकडे काँग्रेसच्या नेतृत्वात संग्राम मोर्चा सुरू असतानाच दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे काँग्रेस कार्यालयसमोर अर्धनग्न आंदोलन सुरू होते. या शेतकऱ्यांनी काँग्रेसचे माजी आमदार सिद्धारम म्हेत्रे यांच्या मातोश्री कारखान्याने ऊस बिल दिले नसल्याचा आरोप केला आहे. तर म्हेत्रे यांच्या कारखान्याने उसाचे बिल दिले नसल्याने मागील २८ दिवसांपासून शेतकरी काँग्रेस कार्यालयाच्या समोर आंदोलन करतायत. तर या प्रश्नाकडे काँग्रेस खासदार कानाडोळा करत दुसरीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चा काढत असल्यावरून आता टीका होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Birsa Munda anudan Scheme : बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून मिळणार बैलगाडी, ट्रॅक्टरचलित अवजारांसाठी अनुदान; जुन्या निकषांतही बदल

Soybean Procurement : ई-समृद्धी पोर्टलवर सोयाबीन खरेदीची नोंदणी शेतकऱ्यांनी की खरेदी केंद्रांनी करायची?

Tur Stock Limit : तूर, हरभऱ्यावरचे स्टाॅक लिमिट काढले; नवी तूर बाजारात येण्याच्या आधी स्टाॅक लिमिट काढल्याने दिलासा

Amravati Zila Parishad : अमरावती जिल्हा परिषदेत विधानसभा च्या तोंडावर, अधिकाऱ्यांची कमतरता

Crop Insurance Compensation : विमा कंपनीच्या पोर्टल बंदमुळे पूर्वसूचना थांबल्या

SCROLL FOR NEXT