Jowar Rate  Agrowon
ॲग्रो विशेष

Jowar Rate : ज्वारीची विक्रीदर अद्याप हमीभावापेक्षाही कमीच

Jowar Market : सरासरी दोन हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर

Team Agrowon

Jowar Production : पारंपरिक पिकांची वाट सोडून नवीन पीक घेण्यासाठी शेतकरी धडपडत असतानाच बाजारपेठांमध्ये मात्र, अपेक्षित दरही मिळत नसल्याची स्थिती आहे. विशेष म्हणजे शासनाने आधारभूत किमतीने ज्वारी खरेदीचे आदेश दिले असून नोंदणी व खरेदी प्रक्रिया राबविली जात आहे. तरीही या घडामोडीचा बाजारपेठांमधील दरांवर सुतराम परिणाम झालेला नाही. बाजारात ज्वारी १७०० पासून ते २४०० रुपये क्विंटलपर्यंत विकत आहे.

या वर्षात रब्बी, उन्हाळी हंगामातील ज्वारीचे पीक तयार झालेले आहे. बाजारपेठेत ज्वारीची विक्री वाढलेली आहे. गेल्या महिना-दीड महिन्यापासून ज्वारीची आवक जोरात सुरू आहे. या काळात ज्वारीचा दर मात्र चढलेला नाही. उलट सरासरी भाव २००० पर्यंत बाजार समित्यांत मिळत आहे.

शासकीय खरेदीची प्रक्रीया सुरू झाल्याने बाजारपेठातील दरांमध्ये वाढ होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. शासनाने पणन विभागामार्फत ८ मे पासून नावनोंदणी तसेच खरेदीची प्रक्रिया राबविण्याविषयी निर्देश दिलेले आहेत.

जिल्हा यंत्रणांनीही केंद्र निश्‍चित करीत नोंदणी, खरेदीची कार्यवाही आपापल्या स्तरावर सुरू करण्याचे सुचवले. ज्वारी हमीभाव ३१८० रुपये एवढा आहे. बाजारात ज्वारी सरासरी २००० रुपयांनी विकत आहे. म्हणजेच हजार रुपयांपेक्षा अधिक तफावत या दोन्ही दरांमध्ये आहे.

उन्हाळी ज्वारीची आवक वाढणार
या हंगामात लागवड झालेले ज्वारीचे पीक अंतिम टप्प्यात पोहचले आहे. आतापर्यंत काही ठिकाणी ज्वारी काढणी सुरू झालेली आहे. तर काही शेतांमध्ये पीक उभे आहे. या महिनाअखेर संपूर्ण काढणी पूर्ण होईल. ज्वारीची आवकही बाजारात वाढेल. खरीप हंगामासाठी पैशांची गरज असल्याने शेतकरी ज्वारी विक्री करणार आहेत. असे असताना दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणारी बाब मानली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : विधानसभा निवडणूक निकालानंतर काय म्हणतायत राजकीय नेते?

Mahayuti Sarkar Formation Formula : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला?; अजित पवारांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड

Congress On Mahayuti : लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफीसह जनतेला दिलेल्या आश्वासनांची भाजप महायुतीने पुर्तता करावी; काँग्रेसची मागणी

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदी अजित पवार 'पुन्हा' ; आमदारांच्या बैठकीत निवड

Soybean Productivity : शासकीय खरेदीसाठी सोयाबीनची उत्पादकता जाहीर

SCROLL FOR NEXT