Jowar Rate : ज्वारीची आवक वाढताच दरात घट

Jowar Market : यंदा ज्वारीला चांगली मागणी राहील, दरही चांगला मिळेल, असा अंदाज व्यक्त होत असतानाच बाजारात ज्वारीची आवक व्हायला सुरुवात होताच, दरात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Jowar Rate
Jowar Rate Agrowon
Published on
Updated on

Nagar News : यंदा ज्वारीला चांगली मागणी राहील, दरही चांगला मिळेल, असा अंदाज व्यक्त होत असतानाच बाजारात ज्वारीची आवक व्हायला सुरुवात होताच, दरात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

ज्वारीसाठी प्रसिद्ध असलेल्या नगर येथील बाजार समितीत २१०० ते ४३०० रुपये व सरासरी ३२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. सध्या दर दिवसाला ८०० क्विंटलपर्यंत आवक होत आहे.

नगर जिल्ह्यासह सोलापूर, बीड, जालना आदी भागांत यंदा पुरेसा पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना रब्बीत अन्य पिकांऐवजी ज्वारी पेरणीला प्राधान्य दिले. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने घट होत असलेल्या ज्वारीच्या क्षेत्रात राज्यात चार लाख हेक्टरने वाढ झाली आहे.

Jowar Rate
Jowar Market : खानदेशात दादर ज्वारीचे दर दबावात

अलीकडच्या काळात ज्वारीची मागणीही वाढली आहे. मागील महिनाभरापूर्वी सात हजार रुपये क्विंटलपर्यंत ज्वारीचे दर गेले होते. मात्र आता ज्वारीची बाजारात आवक होताच दरात घट झाली आहे. नगर जिल्ह्यातील जामखेड, सोलापूर भागातून नगरला ज्वारीची आवक होत आहे.

Jowar Rate
Jowar Production : कहाणी-गोड धाटाच्या ज्वारीची

मागील काही महिन्यांपूर्वी मागणी वाढल्याने ज्वारीचा दर सात हजार रुपये क्विंटलपर्यंत गेला होता. मात्र आता आवक वाढताच दर कमी झाले आहेत. त्यातही किरकोळ आणि ठोक दरात दुपटीने फरक आहे.

ठोक दरात विक्रीला २१०० ते ४३०० रुपये व सरासरी ३२०० रुपयांचा प्रतिक्विंटलला दर मिळत आहे. तर किरकोळ विक्रीचा दर ५० रुपये प्रतिकिलोपेक्षा अधिक आहे. ज्वारीच्या काढणीला वेग आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com