Milk Producer Farmers Sangharsh week Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Rate : संघर्ष समितीच्या 'संघर्ष सप्ताह'ला सुरूवात; कोतुळ बाजारपेठ बंद, दूध हंडी आंदोलन

Milk Producer Farmers Sangharsh Committee : दुधाला ४० रूपये दर मिळावा अशी राज्यातील दूध उत्पादकांची मागणी आहे. याच मागणीसाठी आता दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती रस्त्यावर उतरली आहे. आज पासून संघर्ष समितीकडून 'संघर्ष सप्ताह'ला सुरूवात होणार आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची दुधाला प्रति लिटर ४० रूपये भाव मिळावा, अशी मागणी होत आहे. तर दुधाला प्रति लिटर ४० रुपये भाव मिळावा व दूध प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी दुधाला एफ.आर.पी. व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करावे अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने लावून धरली आहे. मात्र राज्यातील महायुती सरकारकडून या मागण्या फेटाळल्या गेल्या आहेत. त्यामुळे आता दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. सोमवारपासून (ता.१५) 'संघर्ष सप्ताह'ला सुरूवात होणार असून

पहिल्या टप्प्यात दूध दराच्या प्रश्नावर राज्यभर विविध ठिकाणी आंदोलन केल्यानंतर आता 'संघर्ष सप्ताह'ची घोषणा करण्यात आली आहे. या 'संघर्ष सप्ताहा' अंतर्गत राज्यात पुन्हा एकदा आंदोलने करण्यात येणार आहेत. याची सुरूवात सोमवारी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोतुळ येथे झाली आहे. तर आत बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच सकाळी दूध हंडी आंदोलन करण्यात येणार आहे.

आंदोलनाचा १० दिवस

दूध प्रश्नावरून २००९ पासून दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने विविध आंदोलन करण्यात आली आहेत. तर दिनांक १५ जुलै २०२४ रोजी दूध प्रश्नावरून कोतुळ येथे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा सोमवारी १० दिवस आहे.

दरम्यान 'संघर्ष सप्ताहा' अंतर्गत राज्यभरात धरणे आंदोलने, दुग्धाभिषेक, दूध हंडी, दूध परिषदा, मोटार सायकल रॅली, पायी दिंडी, निदर्शने, लोकप्रतिनिधींच्या भेटी, लाक्षणिक उपोषणे व रास्ता रोकोच्या माध्यमातून सबंध आठवडाभर ठिकठिकाणी दूध उत्पादक सरकारचे लक्ष वेधतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT