Mango Market Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Season : गावरान आंब्यांचा हंगाम सुरू

Mango Market : कोकण हापूसचा हंगाम संपत आला असून, आता पुणे जिल्ह्यातील पश्‍चिम घाट परिसरातील गावरान आंब्यांच्या हंगामाला प्रारंभ झाला आहे.

Team Agrowon

Pune News : कोकण हापूसचा हंगाम संपत आला असून, आता पुणे जिल्ह्यातील पश्‍चिम घाट परिसरातील गावरान आंब्यांच्या हंगामाला प्रारंभ झाला आहे. पारंपरिक हापूससह केसर आणि स्थानिक रायवळ, पायरीसह विविध वाणांची आवक होत आहे. ही आवक प्रामुख्याने मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, तर केसरची आवक बारामती, इंदापूर, दौंड, पारनेर या तालुक्यांमधून होत आहे.

पूर्वमोसमी पावसाला सुरुवात झाल्यावर गावरान आंब्यांच्या हंगामाला प्रांरभ होत असल्याचे गावरान आंब्याचे प्रमुख आडतदार तात्या कोंडे यांनी सांगितले. रविवारी (ता.२६) खडकवासला, मुळशी भागातून साधारण ५० क्रेट आवक झाली होती. ही आवक पुढील आठवड्यात वाढून हंगाम जोमात जून अखेरपर्यंत सुरू राहील, असे कोंडे यांनी सांगितले.

कोकण हापूसचा हंगाम संपत आल्याने गावरान आंब्यांना मागणी वाढली आहे. आवक वाढत असल्याने गावरानची खरेदी सुरू झाली आहे. घरगुती ग्राहकांसह किरकोळ विक्रेत्यांकडून मागणी आहे, असेही ते म्हणाले.

प्रति डझनचे दर

हापूस २०० ते ३००

पायरी १५० ते २००

रायवळ ३० ते ५०

केसर प्रतिकिलो ३० ते ८० रुपये

केसरची सुमारे दीड हजार झाडे असून, रविवारी ५७ क्रेट बाजारात आणले. सध्या प्रति किलोला ८० ते ८५ रुपये दर मिळत आहे. सेंद्रिय पद्धतीने पीक घेत आहे. मात्र दर अपेक्षित मिळत नाही. बाजारात सर्व केसर आंब्यांसोबत आमच्या आंब्यांची तुलना होते. याचा फटका बसतो. सेंद्रिय केसरला किमान १०० रुपये दर अपेक्षित आहे.
अप्पासाहेब नरोडे, ढवळपुरी, ता. पारनेर, जि. नगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

Sericulture Farming : पावसाने इतर पिकं गेली, तुती-रेशीम ठरलं आधार; ४ एकरांतून लाखोंचं उत्पन्न | Agrowon

Veterinary Staff Shortage: राधानगरीत रिक्त पदांमुळे जनावरांच्या उपचारात अडचणी

Rain Deficit Impact: पावसाने केळी लागवडीला ‘ब्रेक’

Akola Farmer Loan Waiver: अकोला जिल्ह्यातील ११ हजार ५० शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT