Fish Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Budget 2024 : मत्स्यशेतीला शेतीचा दर्जा द्या; सीफूड एक्सपोर्ट असोसिएशन ऑफ इंडियाची मागणी

Seafood Exporters Association Of India : शेतीला पुरक किंवा जोड व्यवसाय म्हणून पशूपालक केले जाते. त्याचबरोबर अनेक राज्यांमध्ये आता मत्स्यपालन किंवा मत्स्यशेती केली जाते. यावर सीफूड एक्सपोर्ट असोसिएशन ऑफ इंडियाने (SEAI) केंद्र सरकारकडे एक मागणी केली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : देशात काहीच दिवसांत लोकसभेच्या निवडणूका होणार आहेत. पण त्याआधी अर्थमंत्री निर्मला सीतारमण या अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. हा अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला मांडला जाईल. तर याकडे अख्या देशाचे लक्ष लागले आहे. या अर्थसंकल्पात काय मिळणार याकडे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांचेही लक्ष लागले आहे. यादरम्यान सीफूड एक्सपोर्ट असोसिएशन ऑफ इंडियाने केंद्र सरकारकडे मत्स्यशेती बाबत मागणी केली आहे. एसईएआयने आपल्या मागणीत मच्छिमारांना शेतीपूरक शेतकऱ्यांचा दर्जा देण्यासह मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्राचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी केली आहे.

सध्या देशाच्या अनेक भागात मत्स्यशेती केली जात आहे. आपल्या राज्यात शेततळे या योजनेतून देखील अनेक शेतकरी मत्स्यशेतीकडे वळत आहेत. मत्स्यशेतीकडे लोकांचाही कल दिसत आहे. यामुळे या क्षेत्राला कृषी क्षेत्राचा दर्जा मिळाल्यास मत्स्यशेतीत आणखीन अनेक मोठे बदल होऊ शकतात असे एसईएआयने म्हटले आहे.

एसईएआयने पुढे म्हटले आहे की, मुक्त व्यापार करारानुसार आम्हाला इतर देशांमध्ये व्यवसाय करण्याची मोठी संधी आहे. आपल्या देशातील मासे आणि कोळंबीचे जगाला वेड आहे. मासे आणि कोळंबी अमेरिका आणि चीनमध्ये मोठी मागणी आहे. यामुळे आणखी नवीन बाजारपेठांचे दरवाजे आमच्यासाठी खुले झाले तर याचा फायदा होईल. त्यासाठी आम्हाला इतर देशांमध्ये व्यवसाय करण्याची परवानगी दिली जावी.

मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्राचा दर्जा

त्याचबरोबर मच्छिमारांना शेतीपूरक शेतकऱ्यांचा दर्जा मिळाल्यास त्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळू शकेल. याचा आम्हाला कोणताही फायदा मिळणार नाही. पण मच्छिमारांची स्थिती लक्षात घेऊन मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्राचा दर्जा द्यावा अशी आमची मागणी आहे.

मत्स्यव्यवसाय झपाट्याने बदल

गेल्या अनेक वर्षांपेक्षा या नऊ वर्षांत मत्स्यव्यवसाय क्षेत्रात झपाट्याने मोठे बदल झाले आहेत. गेल्या नऊ वर्षांत मत्स्य उत्पादनात ७८ लाख टनांची वाढ झाली आहे. सध्या देशात प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सुरू असून त्यात २०५०० कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. तर गेल्यावर्षी हिच गुंतवणूक ३८.६०० हजार कोटी रुपयांची होती. तसेच जर सरकारकडून मत्स्यव्यवसायाबाबत आणखीन चांगले पावले उचचली गेली तर मत्स्यव्यवसाय क्षेत्र आणखी वाढू शकते असे एसईएआयचे अध्यक्ष पवन कुमार यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी मत्स्यव्यवसाय क्षेत्रास कृषी क्षेत्राचा दर्जा दिल्यास यात आणखी मोठे बदल होतील असेही म्हटले आहे.

जगातील १२९ देशांमध्ये सीफूड निर्यात

जगाच्या पाठिवर भारत १२९ देशांमध्ये सीफूड निर्यात करतो. तर २०१३-१४ च्या तुलनेत निर्यातीत दुप्पट वाढ झाली असून ती यंदा ६४ हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे. २०१३-१४ मध्ये सीफूडची निर्यात ही ३० हजार २१३ कोटी रुपयांची होती. तर कोरोना आणि इतर साथीच्या आजारांमुळे या क्षेत्राला फटका बसला होता. तरिही सीफूड निर्यातीत १११.७३ टक्क्यांनी वाढ झाली आहे असेही एसईएआयचे अध्यक्ष पवन कुमार यांनी माहिती दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

Banana Export : करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियाला रवाना

SCROLL FOR NEXT