Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : पीरबावडा येथे वादळाने उडाले घरांवरील पत्रे

Rain Update : पीरबावडा (ता. फुलंब्री) येथे गुरुवारी (ता. २५) पहाटे दीड वाजे दरम्यान अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे पाच शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे उडून गेले.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : पीरबावडा (ता. फुलंब्री) येथे गुरुवारी (ता. २५) पहाटे दीड वाजे दरम्यान अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे पाच शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे उडून गेले.

पीर धोंडी वस्ती व सांडवा वस्ती परिसरात गुरुवारी पहाटे जोरदार वादळी पाऊस सुरू झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरांवरील पत्रे उडून गेले. तसेच झाडे पडल्याने विद्युत तारही तुटल्या. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला.

घरांवरील पत्रे उडाल्याने शेतकरी संजय मिसाळ, सोनाजी मिसाळ, उत्तम काळे, गमाजी बकाल या शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या कुटुंबांवर आता उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. नुकसानीचा पंचनामा करून शासनाने मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

आडूळ येथे वीज पडून मुलाचा मृत्यू

आडुळ येथे बुधवारी (ता. २४) वादळी पाऊस झाला. बालानगर (ता. पैठण) येथे ही जोरदार पाऊस झाला. ढोरकीन येथेही पावसाने तडाखा दिला. आडूळ परिसरात लिंबाच्या झाडाखाली आडोशाला आजोबांसह थांबलेल्या एक ९ वर्षीय नातवाचा वीज पडून मृत्यू झाला. सिद्धेश्वर अंकुश पाचे असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weekly Weather: राज्यात हलक्या पावसाची शक्यता

Women Empowerment: दोन मुठी तांदूळ आणि दोन रुपयांतून उभी राहिलेली चळवळ

Dragon Fruit Farming: महिला शेतकऱ्याकडून ड्रॅगन फ्रूटचा यशस्वी प्रयोग

Maharashtra Government Online Services: महाराष्ट्र शासनाच्या डिजिटल सेवांचे एकत्रीकरण सुरू; २० ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन व्यवहारांना ब्रेक

Maharashtra Fodder Camps: राज्यात डिसेंबरनंतर चारा छावण्यांना प्राधान्य; दुष्काळात पशुधनासाठी निर्णय

SCROLL FOR NEXT