Crop Insurance : कोऱ्या पंचनामा अर्जावर शेतकऱ्यांच्या घेताहेत स्वाक्षऱ्या

Crop Damage Survey : रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्ती आल्याने पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत वैयक्तिक तक्रार दाखल करणाऱ्या शेतकऱ्यांचे पंचनामे केले जात आहेत.
Crop Insurance
Crop Insurance Agrowon

Akola News : ब्बी हंगामात नैसर्गिक आपत्ती आल्याने पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत वैयक्तिक तक्रार दाखल करणाऱ्या शेतकऱ्यांचे पंचनामे केले जात आहेत. मात्र कंपनी प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या कोऱ्या अर्जावर स्वाक्षऱ्या घेत असून, हा प्रकार तत्काळ थांबविण्यात यावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. या बाबत शेतकऱ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

या बाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की अकोला जिल्ह्यात २६ फेब्रुवारीच्या रात्री सर्वच मंडलांत अवकाळी पावसामुळे तसेच गारपिटीमुळे हरभरा, गहू यांसह इतर शेतीपिकांचे नुकसान झाले होते. तेव्हा शेतकऱ्यांनी एचडीएफसी ॲग्रो इन्शुरन्स कंपनीकडे ७२ तासांच्या आत तक्रारी नोंदवल्या होत्या. त्याबाबत आता पीकविमा कंपनी प्रतिनिधीमार्फत सर्व्हेचे काम सुरू झाले. मात्र चुकीच्या पद्धतीने हे काम होत आहे.

Crop Insurance
Pradhan Mantri Crop Insurance Scheme : पंतप्रधान पीक विमा योजनेचा ८ वर्षात २३ कोटी शेतकऱ्यांना लाभ

शेतकऱ्यांच्या समोर पंचनामा फॉर्म न भरता फॉर्म भरण्याआधीच व शेतीची पाहणी करण्याआधीच फॉर्मवर शेतकऱ्यांची स्वाक्षरी घेतली जात आहे. तसेच शेतीची पाहणी केल्यानंतर सदरहू पंचनामा फॉर्म शेतकऱ्यांसमोर न भरता कार्यालयात जाऊन भरला जात आहे. यामुळे नुकसान झालेले क्षेत्र कमी दाखविण्याची भीती व्यक्त होत आहे. एखाद्या शेतकऱ्याचे दोन एकरांचा विमा काढलेला असेल आणि तेवढे क्षेत्र प्रभावित न दाखवता त्यामधील काही भाग दाखवला जाऊ शकतो.

Crop Insurance
Pradhan Mantri Crop Insurance Scheme : पंतप्रधान पीक विमा योजनेच्या लाभार्थ्यांचा आलेख वाढल्याचा कृषी मंत्रालयाचा दावा

नुकसानीची टक्केवारी अत्यल्प दाखविण्यात येत आहे. या बाबत शेतकऱ्यांना कोणतीही कल्पना देण्यात येत नाही. असा प्रकार अकोला जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत करण्यात येत आहे. ही बाब लक्षात घेता विमा प्रतिनिधींनी भरलेले सर्वेक्षण अर्ज समिती स्थापन करीत तपासावेत. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत आदेश दिले जावेत, अशीही मागणी करण्यात आली. जेणेकरून शेतीमाल नुकसानीच्या भरपाईपासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही.

जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी, जिल्हा उपाध्यक्ष नितीन गावंडे, ज्येष्ठ पदाधिकारी रामहरी आगळे, नितीन खेडकर, सदस्य, नीलेश गुल्हाण, अरुण धर्माक, अ. शहाद अ. रशीद, नाना लढे, रिमाजोद्दीन सलीमोहन सय्यद, मिलिंद वानखेडे, संतोष तायडे यांच्यासह शेतकरी व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com