Ajit Thakur, Director, Maharashtra Chapter, Bamboo Society of India Agrowon
ॲग्रो विशेष

Bamboo Industry Revolution: बांबूमध्ये उद्योगक्रांती घडविण्याची क्षमता

Ajit Thakur, Director, Maharashtra Chapter, Bamboo Society of India: पुणे बांबू फेस्टिव्हल’ हा केवळ उत्सव नाही; तर ते हरित आणि शाश्वत भविष्याच्या दिशेने एक पाऊल आहे. बांबूमध्ये उद्योगांत क्रांती घडवण्याची आणि समाज सशक्त करण्याची क्षमता आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News: ‘पुणे बांबू फेस्टिव्हल’ हा केवळ उत्सव नाही; तर ते हरित आणि शाश्वत भविष्याच्या दिशेने एक पाऊल आहे. बांबूमध्ये उद्योगांत क्रांती घडवण्याची आणि समाज सशक्त करण्याची क्षमता आहे,’ असे विचार बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र चॅप्टरचे संचालक अजित ठाकूर यांनी मांडले.

स्वारगेटच्या गणेश कला क्रीडा मंच येथे बहुप्रतीक्षित ‘पुणे बांबू महोत्सव २०२५’ च्या तिसऱ्या हंगामाचे गुरुवारी (ता. २३) मोठ्या उत्साहात उद्‍घाटन झाले. महाराष्ट्र चॅप्टरच्या बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने व येथील एमआयटी आर्ट, डिझाइन व टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या सहकार्याने आयोजित हा ‘ग्रीन गोल्ड’ महोत्सव सोमवारपर्यंत (ता. २७) सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत पुणेकरांना पाहण्यासाठी खुला राहणार आहे.

या प्रदर्शनासाठी उपस्थित असणाऱ्या प्रथम दोन प्रेक्षक नवनीता क्रिश्नन व विकी बारवकर यांच्या हस्ते फित कापून या महोत्सवाची सुरुवात करण्यात आली.एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ डिजाईनचे संचालक डॉ. नचिकेत ठाकूर म्हणाले, की बांबूला ‘ग्रीन गोल्ड’ म्हणून ओळखले जाते, जगातील सर्वांत वेगाने वाढणारे गवत आहे आणि टिकाव व बहुउपयोगीपणाचे प्रतीक आहे.

कचरा शून्य तत्त्वावर आधारित बांबूचा उपयोग बांधकाम, हस्तकला, पर्यावरण संरक्षण आणि खाद्यपदार्थांमध्ये देखील होतो. बांबूची हीच उपयोगिता लक्षात घेऊन नवकल्पानांना प्रोत्साहित करण्यासाठी व बांबू विश्वाची लोकांना अनुभूती घडविण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

महोत्सवाची वैशिष्ट्ये

बांबू बांधकाम आणि डिझाइन : अभिनव बांबू आर्किटेक्चरचे प्रदर्शन

हस्तकला प्रदर्शन : सुंदर बांबू कलाकृतींचा संग्रह

उत्पादन विक्री : योगा वेअर, इनरवेअर यांसारखी अनोखी बांबू उत्पादने

बांबू लागवड आणि प्रक्रिया : बांबू लागवडीचे व प्रक्रिया करण्याचे मार्गदर्शन

बांबू यंत्रसामग्री : बांबू उद्योग सुरू करण्यासाठी लागणाऱ्या उपकरणांचे प्रात्यक्षिक

सक्षमीकरण कार्यक्रम : महिलांसाठी आणि युवकांसाठी बांबू उपक्रमांद्वारे उद्योजकतेची संधी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Storage Marathwada : मराठवाड्यातील ८७९ प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा ५२ टक्क्यांवर

Marathwada Rain Update : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत पावसाची मध्यम ते दमदार हजेरी

Book Review: अर्थवेचक गोष्टगुंफण

Darwin Theory: ‘डार्विन उत्क्रांती’ सिद्धांताच्या निमित्ताने...

Interview with Dr. Suhas Diwase: राज्यातील जमीन मोजणी जलद आणि पारदर्शक होणार

SCROLL FOR NEXT