Lumpy Skin Agrowon
ॲग्रो विशेष

Khandesh Lumpy Virus : खानदेशात वाढतोय ‘लम्पी स्कीन’चा धोका

Khandesh Lumpy Skin Disease : जळगाव जिल्ह्यात ३००, धुळ्यात ३०, नंदुरबारमध्ये २१ पेक्षा अधिक पशुधन या रोगाने ग्रस्त झाले आहे. मागील वर्षाचा कटू अनुभव असताना देखील यंदा लसीकरण गतीने झालेले नाही.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात ‘लम्पी स्कीन’ रोगाने गायवर्गीय पशुधन बेजार होत आहे. रोगग्रस्त पशुधनाची संख्या दिवसागणिक वाढत आहे. पण पशुसंवर्धन विभाग कमी मनुष्यबळ आणि कागदोपत्री कामकाज रंगविण्यात व्यस्त आहे.

लसीकरण संथच आहे. मागील वर्षी खानदेशात तीन ते साडेतीन हजार पशुधनाचा मृत्यू ‘लम्पी स्कीन’च्या समस्येने झाला. पण प्रशासनाकडील आकडेवारी अतिशय तोकडी, अल्प आहे. कागदावर मागील वर्षी प्रशासनाने काम केले. रोगाचा गतीने फैलाव झाला. खासगी पशुवैद्यकांनी दूध उत्पादक, पशुपालकांची लूट केली. कोट्यवधी रुपयांचे नुकसान मागील वेळेस झाले.

सातपुडा पर्वतात यंत्रणा मागील वेळेस पोहोचलीच नव्हती. जेथून राजकीय प्रेशर आले, तेथेच यंत्रणा पोहोचली, पण कमाल पशुधनपालकांकडे प्रशासन पोहोचलेच नाही. मागील वेळेस पशुधनाला ऑगस्टमध्येच या आजाराने बेजार केले. यंदाही अशीच स्थिती आहे. पण लसीकरण झालेच नाही. फक्त घोषणाबाजी सुरू होती. ती यंदाही कायम आहे.

जळगाव जिल्ह्यात ३००, धुळ्यात ३०, नंदुरबारमध्ये २१ पेक्षा अधिक पशुधन या रोगाने ग्रस्त झाले आहे. मागील वर्षाचा कटू अनुभव असताना देखील यंदा लसीकरण गतीने झालेले नाही. जळगाव जिल्ह्यात मागील महिन्यात तीन लाख लशी दाखल झाल्या. त्यापैकी किती पशुधनाच्या उपयोगात आणल्या, याबाबत प्रशासनाने खुलासा केलेला नाही. लसीकरण संथ आहे.

जळगाव जिल्ह्यात जळगाव, धरणगाव, पारोळा, भडगाव, पाचोरा, चाळीसगाव, जामनेर भागांत लम्पी स्कीनचा विळखा वाढत आहे. रोगग्रस्त पशुधनाला वाचविण्यासाठी रोज ४०० ते ५०० रुपयांची औषधे दूध उत्पादकांना खर्च करावी लागत आहेत.

धुळे व नंदुरबारातही रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. तरीही प्रशासनाकडून कमी मनुष्यबळ, कामाचा ताण, अधिकाऱ्यांची रिक्त पदे अशी कारणे सांगितली जात आहेत. शासकीय औषधे, लशी व त्यातून आपले खिसे भरण्याचे काम अनेक शासकीय कर्मचारी करीत असल्याच्या तक्रारी गावोगावी सहकारी दूध संस्थांत करण्यात आल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Season : रब्बी विकसित कृषी संकल्प अभियानावर तज्ज्ञांचा बहिष्कार

Farmer Study Tour : शेतकरी परदेश अभ्यास दौऱ्याचे अनुदान वाढवा

Cabinet Meeting Maharashtra : यंदा तरी राज्य मंत्रिमंडळाची बैठक मराठवाड्यात घ्या

Sugarcane Farming : राज्यात सलग पावसामुळे ऊसपट्ट्यावर संकटाची छाया

Farmers Protest : कापूस उत्पादकासाठी उभारणार लढा

SCROLL FOR NEXT