Warna Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Warna Dam : वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

Water Discharge Started : धरणातून ११५८५ क्युसेकने विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली.

Team Agrowon

Sangli News : वारणा धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा अतिवृष्टी सुरू झाली आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेतला असून बुधवारी (ता. ३१) विसर्गात ३४९३ क्युसेकने वाढ केली आहे. धरणातून ११५८५ क्युसेकने विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्ह्यात पावसाने उसंत घेतली असून अधूनमधून हलका पाऊस पडत आहे. तर शिराळा तालुक्यात मध्यम पावसाची हजेरी सुरू आहे. शिराळा तालुक्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला होता. मंगळवारी (ता. ३०) धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करून असून ८०९२ क्युसेकने सुरू होता.

त्यामुळे वारणा नदीची पाणी पातळी कमी होऊ लागल्याने वारणा काढच्या गावांना दिसाला मिळाला होता. वारणा धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासांत ७३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. वारणा धरण परिसरात रात्रीपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला असून अतिवृष्टी सुरू झाली. त्यामुळे धरणातून विसर्ग वाढवला आहे.

बुधवारी (ता. ३१) सकाळी वक्रद्वारातून १०,११५ तर विद्युत जनित्रमधून १४७० क्युसेक असा एकूण ११,५८५ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातूनही विसर्ग वाढवला असला तरी, कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत एक ते दोन फुटांनी वाढ होईल, असा अंदाज पाटबंधारे विभागाने दिला आहे.

तसेच वारणा आणि कृष्णा नदी काठच्या गावांना दक्षतेचा इशारा दिला आहे. सांगली येथील आयर्विन पुलाजवळ ३७ फूट ७ इंच पाणीपातळी आहे. बुधवारी (ता. ३१) सांगली जिल्ह्यातील कडेगाव, पलूस, वाळवा मिरज या तालुक्यांत पावसाची रिमझिम सुरू होती. तर शिराळा तालुक्यात पावसाचा जोर वाढला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT