Mahatma Phule Krushi Vidyapeeth Agrowon
ॲग्रो विशेष

Mahatma Phule Krushi Vidyapeeth : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव तडकाफडकी कार्यमुक्त

Transfer of Registrar of Mahatma Phule Agricultural University : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव अरुण बाबूराव आनंदकर यांना तडकाफडकी कार्यमुक्त करण्यात आले आहे.

Team Agrowon

Pune News : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव अरुण बाबूराव आनंदकर यांना तडकाफडकी कार्यमुक्त करण्यात आले आहे. राज्याच्या कृषी सचिवांना विद्यापीठाचे उपकुलसचिव (प्रशासन) विजय पाटील यांनी पाठविलेल्या पत्रात श्री. आनंदकर यांना कार्यमुक्त करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, मंत्रालयातून कृषी खात्याच्या उपसचिवांनी मंगळवारी (ता.८) विद्यापीठाला एक तातडीचे पत्र पाठवले. त्यात प्रतिनियुक्तीच्या कुलसचिवांना कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आला.

मात्र कोणत्या कारणास्तव कार्यमुक्त करावे किंवा त्यांच्या पदावर इतर कोणत्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली, याबाबत मंत्रालयाने काहीही खुलासा केलेला नव्हता. कुलसचिवांच्या कार्यमुक्त करण्याच्या आदेश धडकताच विद्यापीठात चलबिचल झाली. यानंतर कुलगुरू कार्यालयात जलदगतीने श्री. आनंदकर यांच्या कार्यमुक्तीची कागदपत्रे तयार करण्यात आली व काही तासांत कार्यमुक्तीचा आदेशही बजावण्यात आला.

‘‘आनंदकर यांची प्रतिनियुक्तीची सेवा प्रशासकीय कारणास्तव संपुष्टात आणली आहे. त्यांना तत्काळ कार्यमुक्त करावे. तसेच कुलसचिवाचा पदभार आता मृद्‍ व जलसंधारण अभियांत्रिकी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. मुकुंद गंगाधर शिंदे यांच्याकडे हस्तांतरित करावा,’’ असे विद्यापीठाने आदेशात म्हटले आहे.

राज्याच्या चारही कृषी विद्यापीठांमधील कुलगुरू थेट राज्यपाल नियुक्त करतात. प्राध्यापक, विभाग प्रमुख, अधिष्ठाता, सहायक अधिष्ठाता, संचालक अशा उच्च पदांवरील नियुक्तीसाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेतील सेवा प्रवेश मंडळाची शिफारस बंधनकारक असते. मात्र कुलसचिवांची नियुक्ती थेट राज्य शासनाकडून केली जाते. या पदासाठी बहुतेक वेळा महसूल विभागाचा उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी निवडला जातो. या निवडीसाठी मात्र विद्यापीठाचा सल्ला घेतला जात नाही.

राहुरी विद्यापीठात कुलसचिवपदी आलेले श्री. आनंदकर हे मूळ महसूल सेवेतील असून, अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाचे होते. विद्यापीठाशी त्यांचा उत्तम समन्वय होता व त्यांच्या कामकाजाबाबत शासनाकडे कोणताही नकारात्मक अहवाल गेलेला नाही. “कुलसचिवांच्या झालेल्या तडकाफडकी कार्यमुक्तीचे आम्हालाही आश्‍चर्य वाटते. कदाचित, निवडणूक आचारसंहितेच्या बदल्यांपैकी ही एक बदली असण्याची शक्यता आहे,’’ अशी माहिती विद्यापीठाच्या एका उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

कार्यमुक्तीबद्दल बोलण्यास नकार

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिवपदावरून आपणास अचानक कार्यमुक्त का करण्यात आले, असा सवाल श्री. अरुण आनंदकर यांना विचारला असता त्यांनी ‘नो कॉमेन्ट्‍स’ म्हणत याप्रकरणी काहीही बोलण्यास नकार दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Nutrients: पीकवाढीसाठी गंधक, कॅल्शिअम, मॅग्नेशिअमचे महत्त्व

Oilseed Sowing: तेलबिया पेरणी स्थिर; सूर्यफूल पेरा रखडला

Artificial Intelligence: कृत्रिम बुद्धिमत्तेमागील पायाभूत तंत्रज्ञान

Turmeric Quality: जानेफळ येथे हळद गुणवत्ता सुधार विषयावर प्रशिक्षण

Livestock Shed Management: आधुनिक तंत्रज्ञानातून गोठ्याचे स्मार्ट व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT