Mahabeej Managing Director Transfer : सचिन कलंत्रेंची बदली रद्द करा

Mahabeej Department : ‘महाबीज’चे (महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित) व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच अमरावती महापालिका आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
Mahabeej
MahabeejAgrowon

Akola News : ‘महाबीज’चे (महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित) व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच अमरावती महापालिका आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरीप हंगामाचा महत्त्वाचा कालावधी सुरू असून, या काळात ‘महाबीज’ची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.

अशावेळी वरिष्ठ अधिकाऱ्याची बदली करून महाबीज यंत्रणा खिळखिळी का केली जात आहे, असा प्रश्‍न महाबीज संचालकांसह भागधारक विचारत आहेत. त्यामुळे तातडीने त्यांची बदली रद्द करून पुन्हा नियुक्ती दिली जावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती ‘महाबीज’चे संचालक वल्लभराव देशमुख यांनी दिली.

Mahabeej
Sugar Commissioner Transfer : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय आयुक्तांसह साखर आयुक्तांची बदली

सचिन कलंत्रे यांनी डिसेंबर २०२२ मध्ये महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारी स्वीकारली होती. दीड वर्षाचा कार्यकाळ होत असतानाच त्यांची अचानक बदली करण्यात आली. या कार्यकाळात महाबीजला पूर्वपदावर आणण्यासाठी त्यांनी नियोजन व प्रयत्न केले. त्यांच्या पाठपुराव्यामुळे बीजोत्पादकांना तीन वर्षांपासून रखडलेले विविध योजनांचे सुमारे २८ कोटी रुपयांचे अनुदान मिळाले.

Mahabeej
Agriculture Commissioner Transfers : डॉ. प्रवीण गेडाम बनले राज्याचे नवे कृषी आयुक्त

मुळात एमएससी कृषी पदवीधर असणाऱ्या कलंत्रेंनी शेतकऱ्यांपर्यंत महाबीज पोहोचविण्यासाठी उपक्रमही सुरू केले. शेतकऱ्यांसोबत संवाद मेळावे, बांधावर जाऊन भेटी असे उपक्रम सुरू केले. शासन अंगीकृत असलेले हे एकमेव महामंडळ नफ्यात असून शेतकऱ्यांसाठी हक्काचे आहे.

महामंडळाचा आलेख उंचावण्यासाठी संचालक मंडळ, व्यवस्थापकीय संचालक, इतर अधिकारी, भागधारक काम करीत असतानाच कलंत्रेंसारख्या चांगल्या अधिकाऱ्यांची बदली कुठल्या कारणाने झाली, असा प्रश्‍नही देशमुख यांनी विचारला. या वेळी ‘महाबीज’चे भागधारक शेतकरी प्रकाश काकड, हेमंत देशमुख, नंदकिशोर बढे, हरिभाऊ येवले, विकास डाळींबकर, भास्कर कदम, सुनील निवाणे, चंद्रकांत क्षीरसागर आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com