Rojgar Nirmiti Agrowon
ॲग्रो विशेष

Rojgar Nirmiti : बिगरशेती रोजगार निर्मितीचा प्रश्‍न

Employment Generation : महाराष्ट्रापुरते पाहायचे, तर तालुक्याची भौगोलिक वैशिष्ट्ये, लिहिता- वाचता येणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी, तालुका पातळीवरील स्थानिक पायाभूत सुविधा आणि जिल्हा पातळीवरील घटक साधारण ७० टक्के रोजगार निर्मितीला कारणीभूत असतात.

Team Agrowon

नीरज हातेकर

Farmer Family Budget : बिगरशेती रोजगार निर्मितीचा प्रश्‍न कळीचा आहे. केवळ शेतीवर आता सर्वसामान्य शेतकरी कुटुंबांचे बजेट बसत नाही असे NSSO डाटा ओरडून सांगतोय. घरातील किमान एकाला तरी इतर काहीतरी रोजगार गरजेचा असतो.

नाहीतर उत्पन्न आणि खर्चाचा मेळ बसत नाही. बिगर शेती रोजगार कसा निर्माण करता येईल? इकॉनॉमिक census मध्ये गाव पातळीवर ही आकडेवारी असते. आम्ही याचा तालुका पातळीवर विचार करतोय. एखाद्या तालुक्यातील बिगर शेती रोजगाराचे प्रमाण कशावर अवलंबून असते हे बारकाईने तपासून पाहतो आहे.

महाराष्ट्रापुरते पाहायचे, तर तालुक्याची भौगोलिक वैशिष्ट्ये, लिहिता- वाचता येणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी, तालुका पातळीवरील स्थानिक पायाभूत सुविधा आणि जिल्हा पातळीवरील घटक साधारण ७० टक्के रोजगार निर्मितीला कारणीभूत असतात. म्हणून स्थानिक पातळीवर नीट नियोजन करणे आवश्यक आहे.

जिल्हा नियोजन समिती, पंचायत समिती, ग्रामपंचायती, त्यांच्या विकास योजना, हे सगळे स्थानिक रोजगानिर्मितीमध्ये खूप महत्त्वाचे असतात. दुर्दैवाने आपल्याकडे रोजगारनिर्मिती म्हटले, की महाकाय प्रकल्प, प्रचंड मोठे हमरस्ते, धरणे, असाच विचार केला जातो.

यात व्यवस्थापनाचे खूप प्रश्‍न असतात. पण अगदी गाव पातळीवरच्या आकडेवारीचा विचार करून बनवलेला डेटा सेट आतापर्यंत उपलब्ध नव्हता. आता तो तयार झालाय. यातून स्थानिक घटक खूप महत्त्वाचे असतात हे दिसून येतंय. ग्रामपंचायती, त्याचं प्लॅनिंग, त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत, पंचायत समित्या, जिल्हा पातळीवरचे नियोजन हे सगळे नीट करणे खूप आवश्यक आहे.

दुर्दैवाने योजना आयोग नावाची गोष्ट आपण नष्ट करून टाकली आणि नीती आयोग म्हणून फार अधिकार नसलेली संस्था निर्माण केली. राज्य पातळीवर सुद्धा अशीच मित्रा नावाची सल्लागार स्वरूपाची संस्था निर्माण केली आहे.

पण जिल्हा पातळीपासून तालुका ते ग्रामपंचायत ह्यांना विचारपूर्वक जोडण्याचे दीर्घकालीन काम करण्यासाठी स्वतंत्र संस्थात्मक रचना लागेल. एकूण व्यवस्थेचे महत्त्व समजून राजकीय पक्षांनाही योग्य तो आब ठेवावा लागेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT