Onion Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Procurement : ‘नाफेड’मार्फत उन्हाळ कांदा खरेदी लवकरच सुरू करणार

Minister Dr. Bharti Pawar : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘नाफेड’मार्फत उन्हाळ कांदा खरेदी सुरू करण्यासाठी केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी निवेदन दिले.

Team Agrowon

Nashik News : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘नाफेड’मार्फत उन्हाळ कांदा खरेदी सुरू करण्यासाठी केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी निवेदन दिले.

या वेळी झालेल्या चर्चेत सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरच ‘नाफेड’मार्फत उन्हाळी कांदा खरेदी सुरू करण्यात येईल, असे आश्वासन मंत्री गोयल यांनी दिल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली.

सद्यःस्थितीत कांद्याच्या पडलेल्या किमती विचारात घेता ‘नाफेड’मार्फत कांदा खरेदी प्रक्रिया तत्काळ राबविण्यात यावी याकडे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे लक्ष वेधण्यात आले.

ग्राहक व्यवहार विभाग, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय यांच्या निर्देशानुसार, कांद्याचा बफर स्टॉक तयार करण्यासाठी किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत कांद्याची खरेदी केली जाते.

कांद्याची खरेदी शेतकरी उत्पादक कंपनी व महासंघामार्फत शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक संस्थांकडून फार्म गेटवर तसेच सहकारी संस्थांमार्फत लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत बाजार समितीत खुल्या लिलावाद्वारे केली जाते.

चालू हंगामात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले परंतु अवकाळी पाऊस व गारपीट या नैसर्गिक आपत्तींतून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दिलासा मिळावा, यासाठी केंद्रीय मंत्री गोयल यांच्याशी त्यांनी चर्चा केली. मागील हंगामातील कांदा ‘नाफेड’मार्फत खरेदी केल्याने केंद्रीय मंत्री गोयल यांचे आभार मानले.

मागील वर्षी २ लाख ३८ हजार टन कांदा खरेदी

राज्यातील किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत मागील वर्षी २०२२ मध्ये रुपये ३५१ कोटी रकमेचा २ लाख ३८ हजार १९६ टन कांदा खरेदी करण्यात आला होता. यात सरासरी रुपये १ हजार ४७५ प्रति क्विंटल भाव मिळाला होता.

यावर्षीदेखील कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्याने ‘नाफेड’मार्फत कांदा खरेदी करण्यात येईल, असे मंत्री गोयल यांनी सांगितल्याचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कळविले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Second List: कर्जमाफीची दुसरी यादी प्रसिद्ध, ३ लाख ५५ हजार ६१४ पात्र शेतकऱ्यांचा समावेश

Agriculture Graduates Issues: कृषी पदवीधर, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कृषिमंत्र्यांची भेट

Silk Farming: रेशीम शेतीतून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाची संधी : डॉ. महेंद्र ढवळे

Shetkari Samruddhi Kisan Rail: ‘शेतकरी समृद्धी’ किसान रेल नावालाच!

Sugarcane Price Protest: ऊस दर जाहीर न करताच जॅगरी प्रकल्प सुरू, 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली

SCROLL FOR NEXT