Onion Rate news: कांद्याच्या प्रश्नावरून केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार आणि शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची

नाफेडमार्फत सुरू असलेली कांदा खरेदी भाव पाडण्यासाठीच; शेतकऱ्यांचा आरोप
Onion Rate
Onion Rate Agrowon

Onion Market Update नाशिक : लेट खरीप कांदा दरात (Onion Rate) मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. त्यानंतर केंद्र सरकारने नाफेडच्या (NAFED) माध्यमातून कांदा खरेदी (Onion Procurement) सुरू केली. मात्र अत्यल्प खरेदी व उत्पादन खर्चाच्या खाली दरामुळे शेतकऱ्यांकडून या खरेदीवर टीका होत आहे.

नाफेडमार्फत (NAFED Onion Procurement) सुरू असलेली कांदा खरेदी भाव पाडण्यासाठीच असून सरकार याप्रश्नी चालढकल करीत असल्याचा आरोप करीत शेतकरी संघटनेचे नेते व शेतकऱ्यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांना घेराव घातला. निर्यात वाढली म्हणतात,मग शेतमालास भाव का नाही?असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला.

जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजनासाठी रविवार(ता.५) रोजी मंत्री डॉ.भारती पवार शिरसगाव (ता.निफाड) येथे आल्या असताना शेतकऱ्यांनी घेराव घातला.येथे कांदा दरप्रश्नी त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे यांनी शेतमाल दर घसरणीचा मुद्दा मांडला.तसेच नाफेड कांदा खरेदी शेतकऱ्यांसाठी काहीच कामाचे नसल्याचे सांगितले.यावेळी कांदाप्रश्नी केंद्रीय मंत्री डॉ.पवार व बोराडे यांच्यात शाब्दिक चकमक झाली.

Onion Rate
Onion Market : नाफेडने पावले उचलली तरच कांदा उत्पादक शेतकरी वाचेल : शरद पवार।

जर ही खरेदी योग्य नाही,असे शेतकरी संघटनेने लेखी द्यावे आम्ही नाफेडची खरेदी बंद करू,असे सांगत मागणी नसल्याने शेतमालास भाव नसल्याचे कारण पवार यांनी पुढे केले. या उत्तरावर शेतकरी आक्रमक झाले होते.

शेती तोट्यात असल्याने आमच्या मुलांचे लग्न होत नाही.याला सरकारचे धोरण कारणीभूत असल्याचा आरोप उपस्थित शेतकऱ्यांनी केला.या प्रश्नांमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.यावेळी मागण्यांचे निवेदन डॉ.पवार यांना देण्यात आले.

Onion Rate
Onion Rate : राज्यात कांदा प्रश्न बिकट होण्याच्या मार्गावर

एकीकडे नाफेड उत्पादन खर्चाखाली दर मिळत आहे. माते एका फोनवर आपले खरेदी सुरू झाली.सरकार काम करत आहे.नाफेडमुळे भाव वाढतात,खरेदीत स्पर्धा होते असा अजब दावा केंद्रीय मंत्री पवार यांनी यावेळी केला.

भाजपा निफाड विधानसभा अध्यक्ष यतीन कदम यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.मात्र संतप्त शेतकरी काहीही ऐक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.अखेर केंद्रीय मंत्र्यांना या ठिकाणाहून काढता पाय घ्यावा लागला.

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने धोरण आखावे

सध्या नाफेडमार्फत सुरू असलेली कांदा खरेदी ही भाव पाडण्यासाठीच आहे.कारण यात कुठलाही दिलासा शेतकऱ्यांना मिळालेला नाही.सरकारने शेतमालावरील वायदेबंदी उठवावी, शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने धोरण आखावे अशी मागणी बोराडे यांनी मंत्री पवार यांच्याकडे केली.

नाफेडने जागतिक बाजारभावाप्रमाणे कांदा खरेदी करावी आणि खरेदी केलेला कांदा बाजारात न आणता तो समुद्रात बुडवावा. तरच कांद्याला बाजारभाव मिळेल,अशी रोखठोक भूमिका अर्जुन बोराडे यांनी मांडली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com