Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात पारोळा, अमळनेर, जामनेर भागात पाणीटंचाई वाढली आहे. यामुळे टँकरची संख्याही वाढत असून, प्रशासनाची निवडणूक काळात धावपळही होत आहे.
पारोळ्यातील शेळावे खुर्द, पोपटनगर, कराडी सांगवी, दगडी, भिलाली, महाळपूर, कोळपिंप्री, इटनेर येथे विहिरींचे अधीग्रहण केले आहे. तसेच कन्हेरे, चहुत्रे वडगाव येथे नजीकच्या विहिरींतून पाणीपुरवठा केला जात आहे. काही गावांत टंचाईची समस्या वाढत असून, टँकरने पाणी पुरवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
ऊन सतत वाढत आहे. याचा फटका शिवारासह गावांतील पाणी पुरवठ्यासही बसत आहे. जामनेरातील दक्षिण, पूर्व भागात टंचाई आहे. या भागातही टँकर सुरू असून, सुमारे सहा गावांत विहिरींचे अधीग्रहण केले आहे. अमळनेरात पश्चिम, दक्षिण भागात टंचाई असून, पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाची दमछाक होत आहे. या भागातही चार गावांत विहिरींचे अधीग्रहण केले असून, सुमारे १२ गावांत टँकर सुरू आहे.
जिल्ह्यात गिरणा पट्ट्यात पाऊसमान कमी होते. यामुळे या भागातील लहानमोठे प्रकल्प, तलाव आटले आहेत. चाळीस गावांतील मन्याड, पाचोरा-भडगाव भागातील अग्नावती, भोकरबारी, बहुळा या प्रकल्पांतही जलसाठा अल्प आहे. याचा परिणाम शेतीशिवारासह गावांतील पाणी पुरवठ्यावर झाला आहे. अशीच स्थिती सुरू राहिल्यास पुढे टँकरची संख्या दुपटीने वाढेल, अशीही स्थिती आहे.
गिरणा धरणातील जलसाठा आता २८ टक्क्यांखाली आला आहे. चारा छावण्यांसह पाण्याची मागणी केली जात आहे. अशात सर्वत्र व्यवस्था कशी करणार, अशाही प्रश्न प्रशासनासमोर आहे. ४ जूनपर्यंत आचारसंहिता असल्याने लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या बैठरा व अन्य निर्णयप्रक्रियेत सहभागी होऊ शकत नाही, यामुळे अडचण आणखी वाढत आहे.
विहिरी अधिग्रहण
पारोळा तालुक्यातील शेळावे खुर्द, पोपटनगर, कराडी सांगवी, दगडी प्र अ, भिलाली महाळ पूर, कोळपिंप्री, मोहाडी, इटनेर या गावांना अधिग्रहित विहिरीतून पाणीपुरवठा होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.