Panchganga River Pollution Agrowon
ॲग्रो विशेष

Panchganga River Pollution : पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

River Pollution : पंचगंगा नदीला तेरवाड (ता. शिरोळ) बंधाऱ्याजवळ काळे रसायनयुक्त पाणी आले असून, पंचगगा पुन्हा गटारगंगा बनत आहे.

Team Agrowon

Kolhapur News : पंचगंगा नदीला तेरवाड (ता. शिरोळ) बंधाऱ्याजवळ काळे रसायनयुक्त पाणी आले असून, पंचगगा पुन्हा गटारगंगा बनत आहे. रसायनमिश्रित पाण्यामुळे दुर्गंधी पसरली असून आहे.

त्यामुळे परिसरातील नागरिकांचे व पंचगंगा काठावरील लोकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंचगंगेच्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

प्रदूषण करणाऱ्या घटकांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने तत्काळ कारवाई करावी अन्यथा अधिकाऱ्यांना पंचगंगेच्या रासायनिक पाण्याने अंघोळ घालण्याचा इशारा शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) जिल्हाप्रमुख वैभव उगळे यांनी दिला.

दोन-तीन दिवसांपासून पंचगंगा नदीत काळे रसायनमिश्रित पाणी आले असून, मासे मृत्युमुखी पडत आहेत. दूषित पाण्यामुळे शेतीही नापीक बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तेरवाड बंधाऱ्याजवळ कोल्हापूर व इचलकरंजी शहरातील सांडपाणी व औद्योगिक वसाहतीतील रसायनमिश्रित सांडपाणी थेट पंचगंगा नदीपात्रात सोडले जात असल्याने नदी प्रदूषण झाल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी प्रत्येक वर्षी पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कारवाईचे आश्वासन देतात. पाण्याची नमुने तपासणीसाठी नेतात. मात्र त्याचा अहवाल त्याचे पुढे काय झाले हे कधीच समोर आलेले नाही. चौकशीचा व कारवाईचा केवळ फार्स प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून होतो.
- राजू आवळे, शेतकरी, माजी नगरसेवक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

APMC Strike: लातूर अडत बाजारात सलग तिसऱ्या दिवशी सौदा नाही

Agro One Expo: कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा दुसऱ्या दिवशीही उदंड प्रतिसाद

Cotton Farming: कापूस पिकाचे फरदड पीक टाळा; कृषी विभागाचे आवाहन

Rice Quality: गोरगरिबांना होतोय खराब तांदळाचा पुरवठा

Rabi Sowing: मराठवाड्यात १५ लाख ८८ हजार हेक्टरवर रब्बी पेरा

SCROLL FOR NEXT