Girna River : गिरणा नदीवरील बंधाऱ्याला भगदाड

River Bunds : गिरणा नदीवर सावकी-विठेवाडीदरम्यान असलेल्या ब्रिटिशकालीन बंधाऱ्याची दोन दशकांपासून देखभाल व दुरुस्ती झाली नसल्याने या बंधाऱ्याच्या बाजूच्या साईपणजवळील भिंतींना पावसाळ्यातील जास्तीच्या पाण्याने भगदाड पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
Bund Burst
Bund Burst Agrowon
Published on
Updated on

Khamkheda News : गिरणा नदीवर सावकी-विठेवाडीदरम्यान असलेल्या ब्रिटिशकालीन बंधाऱ्याची दोन दशकांपासून देखभाल व दुरुस्ती झाली नसल्याने या बंधाऱ्याच्या बाजूच्या साईपणजवळील भिंतींना पावसाळ्यातील जास्तीच्या पाण्याने भगदाड पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे पाटबंधारे विभागाने या बंधाऱ्याच्या भिंतीची दुरुस्ती करावी, अशी मागणी खामखेडा, सावकी, विठेवाडी भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात गिरणा नदी पात्राला जोडून कळवण, देवळा, मालेगाव तालुक्यात नदीपात्रात नाकोंडा, बेज-भादवण, विठेवाडी-सावकी, लोहोणेर- ठेंगोडे शिवारात गिरणा नदीवर बंधारे बांधून पाटचारीने फड बागायतीची निर्मिती करून शेकडो एकर उसाची शेती केली जात होती. त्यासाठी सिंचन विभागाची स्वतंत्र व कार्यक्षम यंत्रणा कार्यरत होती.

Bund Burst
Water Bunds : बोरी नदीवर आठ साखळी बंधाऱ्यांची निर्मिती

८० च्या दशकानंतर हळूहळू गिरणेच्या पाण्याला ओहोटी लागली आणि फड बागायत हळूहळू मोडीत काढून त्या जागी कांदा, मका, ऊस अशी संमिश्र पिके घेतली जाऊ लागली. ९० च्या दशकात युती सरकारच्या काळात गिरणा मोसम नदीच्या पात्रातील जुन्या ब्रिटिशकालीन बंधाऱ्याची डागडुजी व दुरुस्तीसाठी तत्कालीन आदिवासी विकासमंत्री ए टी पवार यांनी सातत्याने पाठपुरावा करून गिरणा, मोसम नद्यांवरील जुन्या ब्रिटिशकालीन बंधाऱ्याची दुरुस्तीसाठी भरीव आर्थिक तरतूद करून युद्धपातळीवर काम केले.

त्यात काही बंधाऱ्यांची उंचीही वाढविली. त्यात विठेवाडी, सावकी, खामखेडा, भउर असे लाभक्षेत्र असलेल्या जुन्या बंधाऱ्यांच्या उंचीतही वाढ झाली व त्याला पडलेली भगदाडे बुजवून मजबुतीकरण केले होते. परंतु गेल्या तीन-चार वर्षांच्या सततच्या पावसाने व पाण्याच्या दाबामुळे या ब्रिटिशकालीन बंधाऱ्यांच्या दोन्ही बाजूंकडील सायपन जवळील भिंती पाण्याच्या दाबामुळे तुटून निकामी झाल्या आहेत.

Bund Burst
Water Bund : ‘ओव्हरफ्लो’च्या पाण्याने बंधारे भरा

या ब्रिटिशकालीन बंधाऱ्याच्या दक्षिण व उत्तर बाजूकडील भिंतींना पाण्याची नासाडी होत आहे. सध्या जिवंत पाणी असल्याने या पडलेल्या भिंतीमधून बंधाऱ्यातील पाणी वाहून जात आहे. तत्काळ या बंधाऱ्याची दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

सावकी-विठेवाडी येथील ब्रिटिशकालीन बंधाऱ्याच्या उत्तर व दक्षिण बाजूच्या भिंतींना मोठमोठे भगदाड पडून बंधाऱ्यातील पाणी वाहून जात आहे. पाटबंधारे विभागाने तत्काळ या बंधाऱ्याची दुरुस्ती करावी.
- कुबेर जाधव, शेतकरी, विठेवाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com