Chana  Agrowon
ॲग्रो विशेष

E-Peek Pahani : उत्पादकतेचा खोडा त्यात ई-पीकपाहणीची अडचण

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : आधारभूत किमतीने (MSP) हरभरा खरेदीसाठी नोंदणी सुरू झाली असली तरी नगण्य नोंदणी मागे उत्पादकतेचा खोडा व ई-पीक पाहणीची (E-Pikpahani) अडचण असल्याची माहिती आहे.

आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठी (Chana Purchase) २७ फेब्रुवारीपासून नोंदणी सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

प्रत्यक्षात २७ व २८ फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यातील बहुतांश केंद्रांवर ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया सुरूच झाली नव्हती. आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणीचा सुरवातीला घोळ झाला.

त्यानंतर कृषी विभागाच्या द्वितीय अंदाजानुसार रब्बी हंगाम २०२२-२३ साठी हरभरा खरेदी करता हेक्टरी उत्पादकता जाहीर करण्यात आली.

प्रत्यक्ष येणारे उत्पादन व जाहीर उत्पादकतेचा मेळ बसत नसल्याने शेतकऱ्यांना आपला हरभरा आधारभूत किमतीपेक्षा बाजारात मिळणाऱ्या कमी दरानेच विकण्याची वेळ येण्याची शक्यता शेतकरी वर्गातून व्यक्त होत होती.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हरभरा खरेदीसाठी गंगापूर, वैजापूर, जाधववाडी, खुलताबाद, कन्नड, सिल्लोड, सोयगाव, फुलंब्री, पाचोड केंद्र कार्यान्वित करण्यात आले.

केंद्र कार्यान्वित झाले असले तरी यांपैकी केवळ चार केंद्रांवर शेतकऱ्यांनी आतापर्यंत ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यामध्ये गंगापूरच्या केंद्रावर १२, खुलताबाद व पाचोड प्रत्येकी सहा तर जाधववाडी, छत्रपती संभाजीनगर येथील केंद्रावर चार शेतकऱ्यांनी आपली नोंदणी केली आहे.

याशिवाय जिल्ह्यासाठी केवळ आठ क्विंटल हेक्टरी उत्पादकता खरेदीसाठी जाहीर करण्यात आली आहे. ती अत्यल्प असल्याने उर्वरित हरभरा विकावा तरी कुठे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो आहे.

ई-पीक पाहणीत जानेवारीपूर्वी नोंद करणाऱ्याचे वर्ष २०२२ दिसते. याशिवाय डिसेंबर २०२२ पूर्वी नोंदणी करणाऱ्यांचे वर्षही २०२२ दिसते आहे. त्यामुळे उत्पादित हरभरा २०२१-२२ मधील की २०२२-२३ मधील ही समजण्याची मोठी अडचण आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT