Flower Market Agrowon
ॲग्रो विशेष

Flower Market : शेवंती, झेंडूचा भाव वधारला

Flower Rate : गणेशोत्सवापाठोपाठ आता नवरात्र, दसरा व अन्य पूजाविधींसाठी, तसेच सजावटीसाठी फुलांची मागणी वाढते, मात्र यंदा झेंडूसह इतर फुलांच्या किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत १० ते २० रुपयांनी वाढ झाली आहे.

Team Agrowon

Panvel News : गणेशोत्सवापाठोपाठ आता नवरात्र, दसरा व अन्य पूजाविधींसाठी, तसेच सजावटीसाठी फुलांची मागणी वाढते, मात्र यंदा झेंडूसह इतर फुलांच्या किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत १० ते २० रुपयांनी वाढ झाली आहे. गुलाब, शेवंती, मोगरा यंदा चांगलाच भाव खात आहेत. नवरात्रोत्सवात फुलांची मागणी आणखी वाढणार असल्याने भावदेखील वाढण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली.

नवरात्रीतील १० दिवसांसह दसऱ्याला झेंडूच्या फुलांचे महत्त्व अधिक असते. पूजेबरोबरच घराला तोरण हे झेंडूच्या फुलांचेच असते. वाहनांनाही झेंडूच्या फुलांचे हार घातले जातात. या नऊ दिवसांमध्ये अनेक शुभ कामांचे मुहूर्त साधले जातात. त्यामुळे फुलांची मागणी वाढते. याच पार्श्‍वभूमीवर झेंडू उत्पादक शेतकरी हे दसऱ्याच्या तोंडावर फुले येतील, असे नियोजन करत असतात.

याच काळात मात्र ठिकठिकाणी अतिवृष्टीदेखील झाली आहे. परतीच्या पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच दसऱ्याला लागणारी झेंडूची फुलेही बाजारात भाव खाण्याची शक्यता आहे. घटस्थापनेच्या आधी झेंडू ३० ते ४० रुपये किलोने विकला जात असला, तरी नवरात्रीत याच झेंडूला दुप्पट भाव शेतकऱ्यांना मिळणार आहे. बाजारात याची किंमत २०० रुपये किलो झाली आहे. साहजिकच दसऱ्याच्या दिवशी झेंडूची फुलेही शंभरी पार करतील, असा अंदाज आहे.

शेवंती, अष्‍टर १२० रुपये प्रतिकिलो

फूल बाजारात शेवंती, अष्‍टर सध्या १०० ते १२० रुपये किलो भावाने उपलब्ध आहे. शहरात सध्या मावळ, पुणे, नाशिक, पश्‍चिम महाराष्ट्रातून फुलांची आवक होत आहे. सण, उत्सवांमुळे फुलांची मागणी वाढल्यामुळे यंदाच्या किमतीमध्ये सात ते दहा टक्के वाढ झाली आहे, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. सण-उत्सवांच्या निमित्ताने फुलांच्या किमती वाढल्यामुळे सर्वसामान्यांना जरा विचार करूनच सजावट करावी लागणार असल्याचे ग्राहक सांगतात.

बाजारातील फुलांचे भाव

फुलांचे प्रकार भाव (प्रतिकिलो रु.)

१. मोगरा ६००

२. अबोली ४८०

३. शेवंती ४००

४. गुलाब ४००

५. लिली ४००

६. गुलछडी ३२०

७. कणेर २४०

८. अष्टर २००

९. गुलाब पाकळी १२०

१०. कमळ १५० (डझन)

फुलांचे हार भाव (रु.)

१. मोठा हार १०००

२. मध्यम हार ४००

३. तोरण ८० रु. मीटर

परतीच्या पावसामुळे यंदा फुलांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या शेतकऱ्यांनी फुले बाजारात आणलेली नाहीत. नवरात्रीत आवक वाढण्याची शक्यता आहे. त्यातही पावसामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्यामुळे फुलांचे भाव चढेच राहतील.
- दिनेश पाटील, फूलविक्रेते, पनवेल

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता

Farmer Suicides: आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात ‘एसएओ’ पद रिक्‍त

Crop Insurance: मुदतवाढीनंतरही पीकविम्याच्या अर्जांमध्ये ५० टक्क्यांची घट

Agri Student Protest: कृषी पदवीधारकांचा परभणीत आक्रोश मोर्चा

Solapur Rain: सोलापूर जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच

SCROLL FOR NEXT